AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?

ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे. हा सामना 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.

AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 11:32 AM

ब्रिस्बेन : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. चौथा कसोटी सामना वेळापत्रकानुसार ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे. दरम्यान याआधी चौथ्या कसोटी सामन्यावर धोक्याचं सावट आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाने सांगितलं की, “ब्रिस्बेनमध्ये गेल्यास आम्हाला आमच्यावर बंधन घातली तसेच आम्हाला रुममध्येच रहायला सांगितलं तर आम्ही एकाच शहरात उर्वरित 2 कसोटी सामने खेळण्यास तयार आहोत.” तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे. तर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. (Team India are not ready to travel to Brisbane for the fourth Test due to corona rules)

टीम इंडिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया 4 जानेवारीला सिडनीला रवाना होणार आहे. गेल्या काही दिवसात मेलबर्नमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडले होते. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना इथेच थांबवण्यात आलं. तिसरा सामना सिडनीत खेळण्यात येणार की नाही, याबाबत अनिश्चिचतता होती. मात्र तिसरी कसोटी सिडनीमध्येच होणार अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली.

ब्रिस्बेनमध्ये खेळाडूंवर बंधन

सिडनीत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्या. मात्र दोन्ही क्रिकेट संघांना आणि ब्रॉडकास्टिंग सदस्यांना काही अटीशर्थींसह विमानाने इथे येण्याची परवानगी स्थानिक सरकारने दिली. अटीनुसार या खेळाडूंना सामन्या आणि सरावाव्यतिरिक्त आपल्या रुममध्येच रहावे लागणार आहे.

टीम इंडिया क्वारंटाईन राहण्यास तयार नाही

या अटी शर्थींमुळे टीम इंडियास ब्रिस्बेनला जाण्यास तयार नाही, असे वृत्त क्रिकबझने दिलं आहे. या वृत्तानुसार, आम्ही ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर नियमांनुसार 14 दिवस क्वारंटाईन राहू. यानंतर आम्हाला इतर नागरिकांसारखं फिरण्याचं स्वातंत्र्य मिळावे, अशी भूमिका टीम इंडियाने स्पष्ट केली होती.

“सिडनीत येण्यापूर्वी आम्ही 14 दिवस दुबईमध्ये क्वारंटाईन होतो. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन राहिलो. म्हणजेच टीम इंडिया महिनाभर क्वारंटाईन राहिली. त्यामुळे टीम इंडियाची पुन्हा क्वारंटाईन राहण्याची इच्छा नाही” , अशी माहिती टीम इंडियाच्या एका सूत्राने क्रिकबझला दिली.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी वेळोवेळी स्थानिक सरकारच्या नियमांचं पालन केलं आहे. मात्र आता आम्हाला पुन्हा क्वारंटाईन राहायचं नाही. यासाठी आम्ही एकाच मैदानात दोन्ही सामने खेळण्यास तयार आहोत. अशी भूमिका टीम इंडियाची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट

(Team India are not ready to travel to Brisbane for the fourth Test due to corona rules)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.