…तर पंतने परिणामांसाठी तयार राहावे, रवी शास्त्रींची पंतला वॉर्निंग

| Updated on: Sep 16, 2019 | 10:10 AM

रिषभ पंतला वारंवार संधी मिळाली, मात्र स्वत:च्या स्वभावामुळे त्याने बऱ्याच संधी गमावल्या. त्यानंतर आता टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India coach Ravi Shastri) यांनीच थेट रिषभ पंतची अप्रत्यक्षरित्या कानउघडणी केली आहे.

...तर पंतने परिणामांसाठी तयार राहावे, रवी शास्त्रींची पंतला वॉर्निंग
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) त्याच्या वाईट शॉट सिलेक्शनसाठी अनेकदा टीकांना सामोरे जावं लागलं आहे. त्याला वारंवार संधी मिळाली, मात्र स्वत:च्या स्वभावामुळे त्याने बऱ्याच संधी गमावल्या. त्यानंतर आता टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India coach Ravi Shastri) यांनीच थेट ऋषभ पंतची अप्रत्यक्षरित्या कानउघडणी केली आहे. जर तो वेस्ट इंडिज (West Indies tour) दौऱ्यातील चूक पुन्हा करेल, तर त्याला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आता रवी शास्त्री यांनी पंतला दिला (warning to Rishabh Pant). वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान पहिल्याच चेंडूत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात पंत बाद झाला होता.

“यावेळी आम्ही त्याला जाऊ दिलं. त्रिन‍िदादमध्ये पहिल्या चेंडूवर जसा शॉट खेळून तो बाद झाला होता, जर त्याने ती चूक पुन्हा केली, तर त्याला याचे परिणाम भोगावे लागतील. कौशल्य असो की नसो, त्याने यासाठी तयार राहावे”, असं रवी शास्त्री म्हणाले.

“सामन्यात अशा निर्णयांमुळे तुम्ही स्वत:लाच नाही, तर संघालाही निराश करता. क्रिजवर जर तुमच्यासोबत कर्णधार असेल आणि तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल, तर तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागतो”, असंही शास्त्री म्हणाले.

“ऋषभ पंतच्या क्षमतेवर काहीही शंका नाही. मात्र, त्याने आता शॉट सिलेक्शन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या दिशेने काम करायला हवे. त्याने त्याच्या खेळाच्या पद्धतीत बदल करावा असं कुणी म्हणत नाही, पण विराटने सांगितल्याप्रमाणे, सामन्याच्या परिस्थितीनुसार जागरुक राहायला हवं आणि शॉट सिलेक्शनही महत्त्वाचं असतं. जर त्याने यात सुधारणा केली तर चांगलं होईल”, असं रवी शास्त्री म्हणाले.

संबंधित बातम्या :

निवृत्तीनंतर यू टर्न, अंबाती रायडू थेट कर्णधार म्हणून मैदानात उतरणार

विराटचा भावूक फोटो, धोनीने क्रिकेटला अलविदा केल्याचे संकेत?

रोहित शर्मा सलामीला, द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

राशीद खानच्या 11 विकेट, कसोटीत अफगाणिस्तानचा 224 धावांनी विजय