AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : पराभवापेक्षाही टीम इंडियावर मोठं संकट! 30 वर्षात कधीच असं घडलं नाही, आता हातात फक्त 1 संधी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. टॉप ऑर्डरपासून मिडिल ऑर्डरपर्यंत प्रत्येक जण धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय. त्यामुळे भारतीय टीमवर 30 वर्षातील एक मोठ संकट घोघावतय.

IND vs SA : पराभवापेक्षाही टीम इंडियावर मोठं संकट! 30 वर्षात कधीच असं घडलं नाही, आता हातात फक्त 1 संधी
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Nov 25, 2025 | 9:41 AM
Share

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका मायदेशात खेळली जात आहे. त्यामुळे टीम इंडिया या सीरीजमध्ये वर्चस्व गाजवेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण इथे उलटं घडल आहे. मायदेशात घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडिया बॅकफूटवर आहे. भारतीय संघाची लाजिरवाणी स्थिती झाली आहे. ही सीरीज दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी वाटत आहे. भारतीय फलंदाज संपूर्ण सीरीजमध्ये संघर्ष करताना दिसतायत. दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात भारतीय टीमने आतापर्यंत एकदाच 200 धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भारताकडून एकही फलंदाज शतकी खेळी साकारु शकलेला नाही. फक्त यशस्वी जैस्वालने एक अर्धशतक झळकावलं. गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो 58 रन्सवर आऊट झाला.

या सीरीजमध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरपासून मिडिल ऑर्डरपर्यंत सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. सीरीजमध्ये केएल राहुलच्या सर्वाधिक धावा 39 आणि ऋषभ पंतच्या 27 धावा आहेत. रवींद्र जाडेजाचा बेस्ट स्कोर 27 आहे. ध्रुव जुरेलमध्ये एकदाही 20 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. वॉशिंग्टन सुंदर 48 धावांची इनिंग खेळला. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सुंदर एकमेव फलंदाज आहे. दोन कसोटीत 3 डावात मिळून त्याने आतापर्यंत 108 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय सीरीजमध्ये एकही फलंदाज तीन डावात मिळून 100 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

..तर 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडेल

टीम इंडियासाठी शतक झळकावणं कठीण होऊन बसलय. कारण एकही फलंदाज खेळपट्टिवर जास्तवेळ टिकत नाहीय. आतापर्यंत सीरीजमध्ये भारतीय टीमला फक्त एकदा फलंदाजाची संधी मिळाली आहे. गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या डावात एकाही भारतीय फलंदाजाने शतक झळकावलं नाही, तर भारतात खेळल्या गेलेल्या कुठल्याही टेस्ट सीरीजमध्ये शतक न झळकवण्याची 30 वर्षातील ही पहिली घटना असेल.

दक्षिण आफ्रिकेला मात्र जमलं

दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेकडून या सीरीजमध्ये एक शतक लागलं आहे. गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर सेन्युरन मुथुसामीने शतक झळकावलं. त्याने 7 व्या नंबरवर उतरुन सेंच्युरी झळकवली. सेन्युरन मुथुसामीने 206 चेंडूत 109 धावा ठोकल्या. यात 10 चौकार आणि दोन षटकार होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.