जर तो योग्य पद्धतीने खेळला असता..! ऋषभ पंतच्या ‘त्या’ शॉट सिलेक्शनवर मार्को यानसेनचं मोठं वक्तव्य
ऋषभ पंतचं बेजबाबदारपणे खेळणं अनेकांना खटकलं आहे. संघ अडचणीत असताना अशा पद्धतीने खेळणं पटलेलं नाही. त्यामुळे चुकीचा फटका मारताना यानसेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. आता यानसेनने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांना बरोबर कोंडीत पकडलं आहे. खरं तर पाटा विकेटवर भारताने दक्षिण अफ्रिकेच्या तोडीस तोड फलंदाजी करायला हवी होती. पण अवघ्या 201 धावांवर बोळवण झाली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 288 धावांची मजबूत आघाडी मिळाली. खरं भारताकडून फलंदाजांचा बेजबाबदारपणा फलंदाजी करताना अधोरेखित झाला. भारताने 102 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतकडून फार अपेक्षा होत्या. संघाला या संकटातून सावरेल अशी आशा क्रीडाप्रेमींना होती. पण त्याने चुकीचा फटका मारला आणि विकेट फेकून दिली. त्याचा बेजबाबदारपणा पाहून अनेकांना सुनील गावस्कर यांनी दिलेली प्रतिक्रिया आठवली असेल यात काही शंका नाही. यानसेनने ऋषभ पंतला आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. पंतच्या बॅटला चेंडू लागला आणि थेट विकेटकीपरच्या हातात गेला. त्यामुळे ऋषभ पंतचं आव्हान अवघ्या 7 धावांवर संपुष्टात आलं.
ऋषभ पंतच्या अशा पद्धतीने शॉट खेळण्याच्या स्टाईलवर यानसेनला काहीच वाटलं नाही. मार्को यानसेनने सांगितलं की, ‘असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवली तशीच होईल.’ तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यानसेन म्हणाला की, ‘असे काही वेळा होते जेव्हा ऋषभ पंत तो चेंडू पन्नास सीट्स मागे मारला असता, थेट माझ्या डोक्यावरून, आणि मग आपण दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलत असतो.’ यानसेनला भारतीय डावाच्या सुरुवातीलाच वारा आणि खेळपट्टी फार मदत करत नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आखुड टप्प्याची गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मार्को यानसेनने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 6 विकेट घेतल्या. यापैकी पाच विकेट मार्को यानसेने आखुड टप्प्याच्या गोलंदाजीवर घेतल्या. “खरं सांगायचं तर, कोलकात्यात चेंडू जितका वेगाने येत होता तितका वेगाने येत नव्हता, म्हणून आम्हाला एक योजना आखावी लागली,” , असं मार्को यानसेनने सांगितलं. “जेव्हा मी माझा पहिला विकेट (ध्रुव जुरेल) बाउन्सरने घेतला, तेव्हा आम्ही म्हणालो, हे किती वेळ काम करते ते पाहूया आणि ते काम करत राहिले.”, असंही यानसेनने पुढे सांगितलं.
