न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ज्या मैदानावर शेवटचा सामना खेळला, त्याच मैदानावर दमदार खेळाडूचं T20I संघात पुनरागमन, जाणून घ्या संपूर्ण संघ…
Team India Squad New Zealand Tour: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे.

बीसीसीआयने न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ जाहीर केला आहे. भारतीय संघ न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार वर्षांनंतर टी-२० संघात पुनरागमन केले आहे. तर जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यर कर्णधार असेल. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला संघातून वगळण्यात आले आहे.
अनुभवी आणि भेदक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारतीय टी-२० संघात शानदार पुनरागमन केले आहे. निवड समितीने या ३६ वर्षीय गोलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघात समावेश केला आहे. विशेष म्हणजे, भुवनेश्वरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडच्या भूमीवरच खेळला गेला होता. जो टी-२० विश्वचषकानंतर लगेचच झालेला दौरा होता.
View this post on Instagram
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी दोन प्रभावी आयपीएल हंगामांच्या जोरावर त्याने आता राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. विशेषतः आयपीएल २०२६ चा हंगाम भुवनेश्वरसाठी अत्यंत यशस्वी ठरला. ज्यात त्याने ७.९५ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने २८ बळी घेत आपल्या प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याच्या स्विंग गोलंदाजीने आणि डेथ ओव्हर्समधील प्रभुत्वाने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.
पहिला सामना २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. दुसरा टी२० सामना २४ तारखेला, तिसरा २७ तारखेला, चौथा ३० तारखेला आणि पाचवा व अंतिम टी२० सामना १ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल. टी२० मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी ईडन पार्क येथे खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. टी२० संघासाठी दोन यष्टीरक्षकांची निवड झाली आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन हे यष्टीरक्षक असतील.
न्यूझीलंड T20I मालिकेसाठी भारतीय संघ श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश रेड्डी, यज्ञवीर, यज्ञशव, अरविंद, प्रिन्स, अरविंद, अरविंद. सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
