AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट, रोहित आणि बुमराहशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, कर्णधार, सलामीवीर, स्पिनर कोण असणार?

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 नंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी असणार आहे. (Team India tour of Sri Lanka without Virat kohli, Rohit Sharma and Jasprit Bumrah)

विराट, रोहित आणि बुमराहशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, कर्णधार, सलामीवीर, स्पिनर कोण असणार?
भारत विरुद्ध श्रीलंका
| Updated on: May 10, 2021 | 11:05 AM
Share

मुंबई : भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर ((Team India tour of Sri Lanka ) जाणार आहे. टीम इंडियाचा हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 नंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत 3 तर टी 20 मालिकेत 5 सामने खेळण्यात येणार आहेत. मात्र यावेळी संघात नियमित कर्णधार विराट कोहली, आक्रमक बॅट्समन रोहित शर्मा आणि यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह नसेल. (Team India tour of Sri Lanka without Virat kohli, Rohit Sharma and Jasprit Bumrah)

भारतीय क्रिकेट संघाची बेंच स्ट्रेन्थ थूप मोठी आहे. मैदानात जरी 11 खेळाडू खेळत असतील तरीही चांगले प्रदर्शन करणारे खेळाडू संधीची वाट पाहत असतात. भारतीय संघाने अशाच खेळाडूंना कसोटी ते एकदिवसीय आणि टी -20 पर्यंत चांगल्या संधी दिल्या आणि त्या खेळाडूंनी संधीचं सोनं केलं. तेव्हापासून नव्या खेळाडूंना संधी देण्याविषयी सातत्याने चर्चा होत आहे. अशावेळी टीम इंडियाची एकाच वेळी दोन बळकट संघ मैदानात उतरवण्याची खेळी आहे.

मर्यादित ओव्हर्सची एक्सपर्ट टीम श्रीलंकेला जाणार

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्यासंबंदीची माहिती देऊन बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने सगळ्यांनाच कोड्यात टाकलं. मर्यादित ओव्हर्सची एक्सपर्ट टीम श्रीलंकेला जाणार आहे, असं सौरव गांगुली म्हणाला.

दुसरीकडे टी ट्वेन्टी वर्ल्ड देखील तोंडावर आलेला आहे. अशावेळी संघातील इतर युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांचा परफॉर्मन्स कसा होतोय, यावरही टी ट्वेन्टी वर्ल्डकपचा अंतिम संघ अवलंबून असेल.

सलावीमीर कोण…?

संघाचा नियमित सलामीवीर शिखर धवन या दौर्‍यावर असेल आणि बहुधा कर्णधारही असेल. पृथ्वी शॉ त्याच्याबरोबर श्रीलंका दौऱ्यावर सलामीवीर म्हणून जाणार आहे, जेणेकरून पृथ्वी आपला फॉर्म टिकवून ठेवू शकेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास तयार असेल. याशिवाय कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पद्धिकल आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना सलामीवीर म्हणून संघात संधी मिळू शकते.

मिडल ऑर्डर कोण सांभाळणार?

सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, संजू सॅमसन असे पर्याय भारतीय संघासमोर आहेत. यातील कुणाला अंतिम 11 मध्ये संधी मिळते ते पाहणे महत्त्वाचे आहे.

बोलिंगचं आक्रमण कसं असणार?

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर, क्रुणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल रवि बिश्नोई, असे एकाहून एक सरस स्पिनर्सचे पर्याय भारतीय संघाजवळ आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये कमाल करुन दाखवली आहे.

भुवनेश्वर कुमारला इंग्लंड दौर्‍यात संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत तो श्रीलंका दौऱ्यावर जाणार हे जवळपास नक्की आहे. तो कर्णधारपदाचा दावेदारही होऊ शकतो. दीपक चाहर, नवदीप सैनी, युवा गोलंदाज कार्तिक त्यागी, टी नटराजन हे भुवीच्या साथीला असतील. तसेच कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल आणि शिवम मावी असे पर्याय आहेत.

(Team India tour of Sri Lanka without Virat kohli, Rohit Sharma and Jasprit Bumrah)

हे ही वाचा :

Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.