ICC T20 World Cup | …तर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत होईल : मोहम्मद कैफ

आगामी 2021 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे.

ICC T20 World Cup | ...तर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत होईल : मोहम्मद कैफ
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 12:31 PM

मुंबई : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. मात्र यानंतर 2-1 च्या फरकाने टी 20 मालिका जिंकली. आगामी वर्षात म्हणजेच 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20I World Cup) भारतात आयोजन करण्यात आलं आहे. ही वर्ल्ड कप स्पर्धा भारतात असूनही टीम इंडियाचा पराभव होईल, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) केली आहे. Team India will lose the T20 World Cup in 2021, said Mohammad Kaif

कैफ असं का म्हणाला?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. ही मालिका जिंकल्यानंतरही कैफने अशी प्रतिक्रिया का दिली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कैफनं असं म्हणण्यामागेही कारण आहे. फिल्डिंग टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आली आहे. खराब फिल्डिंगमुळेच टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 सामन्यात 12 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाच्या या फिल्डिंगमुळे कैफने ही भविष्यवाणी केली आहे.

खराब फिल्डिंगमुळे कैफ नाखूश

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला. या जोरावर त्यांनी 187 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी मिस फिल्डिंग केली. तसेच महत्वाच्या कॅचेस ही सोडल्या. टीम इंडियाने आपल्या फिल्डिंगमध्ये सुधारणा केली नाही, तर महत्वाचे सामने जिंकण्यास फार अडचण होईल, असं कैफने नमूद केलं.

कैफ नेमकं काय म्हणाला?

“एकाच सामन्यात इतक्या कॅचेस, मिस फिल्डिंग होणं अपेक्षित नाही. हे जरा अति होतंय. पुढील वर्षी भारतात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात येणार आहे. जर टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकायची असेल, तर फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागेल. जर वेळेतच आपल्या फिल्डिंगमध्ये बदल केले नाहीत, तर अवघड होऊन जाईल”, अशी भिती कैफने व्यक्त केली. युवा गोलंदाज तेव्हा दबावात येतो, जेव्हा त्याला फिल्डर्सकडून सपोर्ट मिळत नाही. आम्ही आमच्या वेळेस चांगली फिल्डिंग करता यावी, यासाठी अधिक वेळ सराव करायचो, असंही कैफने म्हटलं. कैफ सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर एका कार्यक्रमादरम्यान बोलत होता.

संबंधित बातम्या :

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

India vs Australia 2020 3rd T20 : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव

Team India will lose the T20 World Cup in 2021, said Mohammad Kaif

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...