मुंबई इंडियन्समधील 'या' खेळाडूंच्या एन्ट्रीने विराटच्या अडचणी वाढणार

RCBVsMI मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI) होणाऱ्या आजच्या आईपीएल (IPL) सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. हा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघ आयपीएलमधील आपल्या धमाकेदार खेळीसाठी ओळखले जातात. आयपीएलच्या 12 व्या हंगामात या दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामना खेळला असून दोघांनाही पराभव पाहावा लागला आहे. अशात …

मुंबई इंडियन्समधील 'या' खेळाडूंच्या एन्ट्रीने विराटच्या अडचणी वाढणार

RCBVsMI मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI) होणाऱ्या आजच्या आईपीएल (IPL) सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. हा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघ आयपीएलमधील आपल्या धमाकेदार खेळीसाठी ओळखले जातात.

आयपीएलच्या 12 व्या हंगामात या दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामना खेळला असून दोघांनाही पराभव पाहावा लागला आहे. अशात या सामन्यात दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरतील. विजयासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे.

आरसीबीतून नवदीपला सुट्टी मिळण्याची शक्यता

आरसीबीचा फिरकी गोलंदाज नवदीप सैनीची एन्ट्री याच आयपीएल सीझनमध्ये झाली आहे. नवदीपने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात सर्वात वाईट कामगिरी केली. नवदीपने कोणत्याही विकेटशिवाय 4 षटकांमध्ये सर्वाधिक 24 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे कोहलीने नवदीपला पर्याय म्हणून वाशिंग्टन सुंदर याचाही पर्याय म्हणून विचार करु शकतो. सुंदर अंतिम षटकांमध्ये आक्रमक खेळीसोबतच पावर प्लेमध्ये चांगली गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे कोहलीने सुंदरला संधी दिल्यास विशेष वाटायला नको.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात नवदीपशिवाय चहलने 4 षटकांमध्ये केवळ 6 धावा देत 1 विकेट घेतली होती. उमेश यादवने 3 षटकांमध्ये 13 धावा दिल्या. मोहम्मद सिराजनेही 2 षटकांमध्ये 5 धावा देत 1 विकेट घेतली होती.

मयांक मार्कंडेयला मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळणार?

मुंबई इंडियन्सचा ‘स्विंग मास्टर’ रसिख सलामवर आजच्या सामन्यात टांगती तलवार असणार आहे. जम्मू कश्मीरच्या 17 वर्षीय सलामला दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजांवर अंकुश ठेवता आलेला नाही. त्याने 4 षटकांत एकही विकेट न घेता सर्वाधिक 42 धावा दिल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मागील वर्षीच्या आयपीएलमधील ‘स्टार लेग स्पिनर’ मयांक मार्कंडेयला संधी देऊ शकतो. मयंकने मागील आयपीएलमध्ये 14 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या.

मलिंगाच्या परतीची चिन्हे

मुंबई इंडियन्सकडून फिरकीसोबतच आपल्या वेगवान गोलंदाजांमध्येही बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे आयपीएलचा स्टार गोलंदाज आणि ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगाला संघात स्थान मिळू शकते. कारण संघाला शेवटच्या षटकांमध्ये चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. मिचेल मॅक्लेघन मागील सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये महागात पडला. त्याने 4 षटकांमध्ये 3 विकेट घेतल्या, मात्र अंतिम षटकांमध्ये त्यांच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई झाली. त्याने एकूण 40 धावा दिल्या. त्यामुळे अशा स्थितीत मलिंगा रोहितसाठी चांगला पर्याय ठरु शकतो. मलिंगा जसप्रीत बुमराहसोबत शेवटी संघाला चांगला आधार देऊ शकतो. मलिंगाकडून गोलंदाजीतील प्रयोग संघासाठी फायद्याचे ठरु शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *