बुटांमुळे ‘या’ 3 क्रिकेटपटूंवर घातलेली बंदी, करीयरचं धक्कादायक सत्य येताच…
बुटांमुळे 'या' 3 क्रिकेटपटूंचं झालं मोठं नुसकान, त्यांच्यावर घालण्यात आली बंदी... करीयरचं धक्कादायक सत्य येताच..., क्रिकेटपटू कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतात चर्चेत...

बुटांमुळे कधी कोणत्या क्रिकेटवर बंदी येवू शकते? क्रिकेटपटूंना कोण बॅन करू शकतं? क्रिकेटविश्वातील असे अनेक किस्से आहेत, जे फार कोणाला माहिती नाहीत. सध्या त्या 3 क्रिकेटपटूंची चर्चा सुरु आहे, ज्यांच्यावर बुटांमुळे क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. अशा खेळाडूंमध्ये, दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहेत तर एक इंग्लँडचा क्रिकेटपटू आहे. प्रत्येकाकडे त्यांच्या बुटांमुळे बंदी घालण्याचं स्वतःचं कारण आहे.
बुटांमुळे मैदानावर बंदीचा सामना करणाऱ्या खेळाडूंपैकी एक ऑस्ट्रेलियाचा जॉन बेनो होता. तो प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिची बेनो याचा लहान भाऊ आहे. 11 मे 1944 रोजी जन्मलेल्या जॉन बेनो यांना करीयरमध्ये बंदीचा सामना करावा लागला होता.
जॉन बेनो यांनी चुकीचे बूट घावून मैदानात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या 2 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होता. तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधार एलन बॉर्डर होते.




डिसेंबर 2023 मध्ये, ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजावरही बुटांमुळे बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, तो त्याच्या बुटांवर दोन स्लोगन लिहिले होते. पहिलं स्लोगन ऑल लाइव्स आर इक्वल आणि दुसरं स्लोगन फ्रीडम इज अ ह्यूमन राइट… असं आहे… ज्यामुळे उस्मान ख्वाजावरही बुटांमुळे बंदी घालण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाच्या आधी इंग्लंडच्या मोईन अलीलाही त्याच्या बुटांमुळे बंदी घालण्यात आली होती. त्याने देखील बुटांवर स्लोगन लिहित मैदानात प्रवेश केला होता. 2014 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान, तो त्याच्या बुटांवर ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेलं असताना मैदानात उतरला होता.
तिन्ही खेळाडूंच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, जॉन बेनोने ऑस्ट्रेलियासाठी 3 कसोटी सामने खेळले आहेत. तर उस्मान ख्वाजाने आतापर्यंत 80 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. तर मोईन अलीने इंग्लंडकडून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत.
क्रिकेटर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.