Under-19 World Cup : पाकिस्तानकडे दोन, ऑस्ट्रेलियाकडे तीन वेळा, टीम इंडियाकडे किती वेळा विजेतेपद?

Under-19 World Cup : पाकिस्तानकडे दोन, ऑस्ट्रेलियाकडे तीन वेळा, टीम इंडियाकडे किती वेळा विजेतेपद?

अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक विजेतेपद भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नावे या रेकॉर्डची नोंद झाली (Under-19 World Cup Winner) आहे.

Namrata Patil

|

Feb 10, 2020 | 12:04 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर 3 गडी राखत मात (Under-19 World Cup Winner) केली. यामुळे पहिल्यांदाच बांगलादेशने 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरलं. भारताने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान बांग्लादेशने 3 गडी राखत पूर्ण केलं. अंतिम टप्प्यात टीम इंडियाने हा सामना गमावल्याने भारताची पाचव्यांदा विश्वविजेतेपदाची संधी हुकली. असं असलं तरी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक विजेतेपद भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नावे या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेला 1988 मध्ये सुरुवात ऑस्ट्रेलियामध्ये झाली. दर दोन वर्षांनी विश्वचषकाची स्पर्धा खेळवली जाते. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्यानतंर 1998 मध्ये इंग्लंड विश्वचषक स्पर्धेचा विजेता ठरला होता.

या स्पर्धेतील सर्वाधिक विजेतेपद हे भारताकडे आहे. 2000 मध्ये श्रीलंकेत खेळवण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली. श्रीलंकेला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभव करत भारताने पहिल्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात करत भारत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी (Under-19 World Cup Winner) ठरला.

त्यानंतर 2012 आणि 2018 या दोन्ही वर्षांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरलं होतं. तर दुसरीकडे 2006, 2016, 2020 या तिन्ही वर्षांमध्ये टीम इंडिया उपविजेता ठरली आहे.

दरम्यान 19 वर्षाखालील विश्वचषकाचं सर्वाधिक विजेतेपद हे भारताकडे आहे. तर ऑस्ट्रेलियानेही ही स्पर्धा 1988, 2002, 2010 अशा तीन वेळा जिंकली आहे. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही 2004, 2006 असे दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं (Under-19 World Cup Winner) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें