Uttarakhand Chamoli Glacier burst | रिषभ पंतचं सामाजिक भान, चेन्नई कसोटीचं मानधन उत्तराखंड दुर्घटनाग्रस्तांना

रिषभ पंतने (Rishabh Pant) उत्तराखंडमधील या दुर्देवी घटनेबद्दल ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Uttarakhand Chamoli Glacier burst | रिषभ पंतचं सामाजिक भान, चेन्नई कसोटीचं मानधन उत्तराखंड दुर्घटनाग्रस्तांना
रिषभ पंत
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:26 PM

चेन्नई : उत्तराखंडमध्ये काल 7 फेब्रुवारीला दुर्देवी घटना घडली. उत्तराखंडाकतील जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला. या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये अनेक जण वाहून गेली. काही मृत्यूमुखी पडले. तर काही अजूनही बेपत्ता आहे. या घटनेमुळे अनेक जणांचे नुकसान झाले. या दुर्घटनाग्रस्त लोकांसाठी टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिषभ पंतने मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिले कसोटीचे मानधन या दुर्घटनाग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा पंतने केली आहे. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (uttarakhand chamoli glacier burst rishabh pant announce to donate match fee for the rescue efforts)

पंतने केलेले ट्विट

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“उत्तराखंडातील या दुर्घटनेमुळे मी अत्यंत दुखी आहे. यामुळे मी चेन्नई कसोटी सामन्याचे मानधन बचाव कार्यासाठी आणि स्थानिक जनतेसाठी मदत म्हणून देत आहे”, असं पंतने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंत स्थानिक क्रिकेट दिल्लीसाठी खेळतो. पण तो मुळचा उत्तराखंडचा आहे. या घटनेमुळे पंतला अधिक वेदना झाल्या आहेत. तसेच पंतने यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत संवेदना व्यक्त केली.

मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत : मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह

या दुर्देवी घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी दोन वेळा फोन करत घटनेची चौकशी केली. तसेच बिहार, गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फोनद्वारे या घटनेची माहिती घेत संवेदना व्यक्त केली.

पंतची शानदार खेळी

पंतने इंग्ंलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना 91 धावांची खेळी केली. पंत आणि पुजाराने पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला. पंतकडे शतक लगावण्याची सुवर्णसंधी होती. पण फटकेबाजीच्या नादात पंत 91 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 9 फोर आणि 5 उत्तुंग षटकार खेचले.

संबंधित बातम्या :

Uttarakhand Chamoli Glacier burst : तपोवन बोगद्यात बचावकार्य थांबवले, 10 जणांचे मृतदेह हाती

Photo : महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाहा फोटो

VIDEO| Uttarakhand Joshimath Dam : उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पावरचं धरण फुटलं; गंगा किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

(uttarakhand chamoli glacier burst rishabh pant announce to donate match fee for the rescue efforts)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.