AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवायला आला अन् 12 मिनिटात ‘गेम ओव्हर’, वैभव सूर्यवंशीची जादू टेस्टमध्ये फिकी

Vaibhav Sooryavanshi Red Ball Cricket: दुलीप ट्रॉफी 2026 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बेंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग यांच्यात खेळला जात आहे. ईशान्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो बॅटने धुमाकुळ घालताना दिसतो. आता मात्र वैभव मैदानात पूर्णपणे फेल झालेला पाहायला मिळाला.

Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवायला आला अन् 12 मिनिटात 'गेम ओव्हर', वैभव सूर्यवंशीची जादू टेस्टमध्ये फिकी
| Updated on: Aug 23, 2026 | 11:44 AM
Share

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy 2026: दुलीप ट्रॉफी 2026 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बेंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग यांच्यात खेळला जात आहे. ईशान्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर होत्या. वैभव बऱ्याच काळानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये परतला. वैभव जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो बॅटने धुमाकुळ घालताना दिसतो. आता मात्र वैभव मैदानात पूर्णपणे फेल झालेला पाहायला मिळाला.

वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी ईशान्य विभागाविरुद्ध डावाची सुरुवात केली. वैभव आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवून या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल अशी चाहत्यांना मोठी आशा होती, पण तसे काहीच झाले नाही. दोन चौकारांसह 6 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा करून तो बाद झाला. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विश्वजित कोंथौजमने त्याला बाद केले आणि जोसेफ लालथनखुमाने तो झेल पकडला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वैभव सूर्यवंशीची कामगिरी आतापर्यंत विशेष उल्लेखनीय राहिलेली नाही. या सामन्यात मोठी खेळी करून आपली खराब कामगिरी सुधारण्याची संधी त्याला होती, पण तसे झाले नाही. या दुलीप ट्रॉफीसाठी वैभवची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेत ईशान किशन संघाचे नेतृत्व करेल. पूर्व विभागीय संघात मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि शहबाज अहमद यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

गेल्या वर्षीचे अंतिम स्पर्धक असल्याने, मध्य विभागीय आणि दक्षिण विभागीय संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दोन्ही उपांत्य सामने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ग्राउंड 1 आणि ग्राउंड 2 वर खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. विजेतेपदाचा सामना चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.

सामन्यासाठी पूर्व विभागाचा संघ

वैभव सूर्यवंशी (उप- कर्णधार) अभिमन्यु ईश्वरन, ईशान किशन (विकेटकीपर/कप्तान), सुभ्रांशु सेनापती, विराट सिंह, शाहबाज अहमद, अनुकूल रॉय, अभिजीत के सरकार, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, डेनिश दास, कुमार कुशाग्र, सुदीप कुमार घरामी, सूरज सिंधु जयसवाल, शिखर मोहन

Follow Us
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती