Vaibhav Sooryavanshi : फॉर्मेट बदलताच कामगिरीवर परिणाम, वैभवसमोर कमबॅक करण्याचं आव्हान
Vaibhav Sooryavanshi : क्रिकेट चाहत्यांनी गेल्या दीड वर्षांत वैभव सूर्यवंशी याची फटकेबाजी पाहिली. मात्र आता वैभवची बॅट शांत झालीय. आयपीएलमध्ये धावांची लयलूट केलेल्या वैभवला वनडे क्रिकेटमध्ये मात्र संघर्ष करावा लागत आहे.

आयपीएल स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. वैभवच्या या कामगिरीनेच बीसीसीआय निवड समितीला त्याला भारतीय संघात स्थान देण्यास भाग पाडलं. निवड समितीने 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. वैभवचा या दोन्ही संघात समावेश करण्यात आला. वैभव त्याआधी श्रीलंका दौऱ्यात इंडिया ए कडून खेळत आहे. मात्र वैभवला या स्पर्धेत आतापर्यंत चांगलाच संघर्ष करावा लागल्याचं चित्र आहे. वैभवने कमी वयात दिग्गज गोलंदाजांची धुलाई करुन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तर आताही चाहत्यांचं लक्ष वैभवकडेच आहे. आयपीएल स्पर्धेत सहजासहजी अर्धशतक करणाऱ्या वैभवला श्रीलंका दौऱ्यात फॉर्मेट बदलल्याने 4 सामन्यांत...
