AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट, रोहितही धावा करत नव्हते, पण शतकानंतरही मला ड्रॉप केलं ; धोनीवर टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा आरोप

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर एका माजी खेळाडूने गंभीर आरोप केले आहेत. शतकी खेळीनंतरही मला संधी मिळाली नाही, उलट ड्रॉप करण्यात आलं असा आरोप त्याने केला.

विराट, रोहितही धावा करत नव्हते, पण शतकानंतरही मला ड्रॉप केलं ; धोनीवर टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा आरोप
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचे धोनीवर गंभीर आरोप
| Updated on: Jan 25, 2025 | 8:05 AM
Share

Manoj Tiwary Accused MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अर्था एम.एस.धोनी हा नेहमीच चर्चेत असतो. त्याची फलंदाजी, त्याची कॅप्टन्सी याचं नेहमीचं कौतुक होत असतं. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भारताचा माजी क्रिकेटर मनोज तिवारी हा आपल्या भेदक वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. आता त्याने महेंद्रसिंग धोनीवर ताशेरे ओढले आहेत. मनोज तिवारी हा खूप टॅलेंटेड, प्रतिभावान खेळाडू होता, पण टीममधून वगळण्यात आल्यामुळे त्याने इतरांवर निशाणा साधला आहे. 2011 साली वेस्टइंडीजच्या विरुद्ध शतकी खेळी केल्यानंतरही त्याला फारशी संधी मिळू शकली नाही. त्यानतंर तो श्रीलंकेविरोधात 2 सामने खेळला, मात्र त्यानंतर त्याला ड्रप करण्यात आलं.

एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, मनोज तिवारी म्हणाला ” तो कॅप्टन होता, पण ती कोणाची चूक होती. भारतीय संघ हा कॅप्टनच्या प्लानिंगनुसार चालतो. राज्याच्या संघाची बाब वेगळी असते, पण भारतीय टीम फक्त कॅप्टन चालवतो. कपिल देव यांच्याबद्दल बोललं तर ते संघ चालवत होते, सुनील गावस्कर कर्णधार असताना हातात संघाची कमान होती आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काळातही असंच काहीसं होतं. सौरभ गांगुली आणि त्यांच्यानंतरही असंच होत आलंय. जोपर्यंत एखादा अधिकारी येऊन कडक नियम बनवत नाही तोपर्यंत असंच चालू राहील. ” असं तो म्हणाला.

एमएस धोनीवर उपस्थित केले अनेक प्रश्न

संघातून वगळल्याबद्दल मनोज तिवारीने एमएस धोनीवर निशाणा साधला. मला शतकानंतर आणखी संधी मिळायला हवी होती, पण तसं काहीच झाले नाही, असे तो म्हणाला. त्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाही धावा करू शकले नव्हते, पण तेव्हा फक्त मलाच ड्रॉप करण्यात आलं, असंही तिवारीने नमूद केलं. वेस्ट इंडिजविरोधात झळकावलेलं शतक, त्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्करा मिळल्यानंतरही माझा प्लेईंग 11 मध्ये समावेश झाला नाही, असा आरोप त्याने लावला.

” मला 14 सामने टीबाहेर बसवण्यात आलं, 6 महिन्यांच्या कालावधीत ते ( सामने) झाले. त्यावेळी ड्रॉप करण्यात आलेल्या खेळाडूला अभ्यासासाठी, सरावासाठी फारशी संधी मिळत नव्हती. मला निवृत्त व्हायचं होतं, पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे मी असं करू शकत नव्हतो ” असे त्याने नमूद केलं.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.