विराट कोहलीचं शतक, सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिले 5 कोण?

अॅडिलेड: टीम इंडियाचं रनमशिन विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावलं. विराटचं हे वन डेतील 39 वं शतक आहे. सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टस सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. दरम्यान कोहलीने 108 चेंडूत आज शतक पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 299 …

विराट कोहलीचं शतक, सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिले 5 कोण?

अॅडिलेड: टीम इंडियाचं रनमशिन विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावलं. विराटचं हे वन डेतील 39 वं शतक आहे. सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टस सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. दरम्यान कोहलीने 108 चेंडूत आज शतक पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 299 धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.

दरम्यान कोहलीने केवळ 218 व्या सामन्यात 39 शतकं पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवला. सचिन तेंडुलकरने 463 सामन्यात 49 शतकं ठोकली आहेत. आता कोहली सचिनचा विक्रम किती सामन्यात मोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगने 375 वन डेमध्ये 30 शतकं ठोकली आहेत. तर चौथ्या नंबरवरील श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 445 सामन्यात 28 शतकं पूर्ण केली. या यादीत पाचव्या नंबरवर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे. आमलाने 169 सामन्यात 26 शतकं झळकावली आहेत.

भारताचा रोहित शर्मा 22 शतकांसह नवव्या क्रमांकावर आहे. तर गांगुली 22 शतकांसह दहाव्या स्थानी आहे.

भारतासमोर 299 धावांचं लक्ष

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली.

तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. कारण, पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतलं आव्हान कायम राखण्यासाठी भारताला ही महत्त्वाची लढत आहे. पण ऑस्ट्रेलियाने मोठं आव्हान दिल्यामुळे सर्व मदार आता भारतीय फलंदाजांवर असेल.

संबंधित बातम्या

AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *