Virat Kohli : विराट कोहली याचा धमाका, रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा.. काय झालंय?

Virat Kohli : विख्यात क्रिकेट विराट कोहलीने मोठा धमाका केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामनाय्त एकामागोमाग एक शतक ठोठावणाऱ्या विराटने आता...

Virat Kohli : विराट कोहली याचा धमाका, रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा.. काय झालंय?
विराट कोहलीचा धमाका
Image Credit source: social media
| Updated on: Dec 10, 2025 | 2:58 PM

Virat Kohli ICC Ranking : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli ) याचा जलवा मैदानात तर दिसलाच पण आता हा दिग्गज खेळाडू आयसीसी रँकिंगमध्येही धमाका करण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकामागोमाग एक शानदार शतकं झळकावत जबरदस्त कामगिरी करणारा विराट कोहली आता आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत (ICC Ranking) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने इतर दोन फलंदाजांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. राईट हँड बॅट्समन असलेला कोहली याने न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल आणि अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झद्रान यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचाच रोहित शर्मा हा या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे, पण विराट हा आता त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

आयसीसी रँकिंगमध्ये विराटचा धमाका

आयसीसीच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली हा 773 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो रोहित शर्मापेक्षा फक्त आठ गुणांनी मागे आहे. रोहितचे 781 गुण असून तो टॉप वनडे बॅट्समन आहे. मात्र आता विराट त्याच्या अगदी नजीक पोहोचला असून तो कधीही त्याला मागे टाकू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या. रांची आणि रायपूर येथे झालेल्या वनडे मॅचमध्ये त्याने सलग दोन शतकं झळकावली. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तो 65 धावांवर नाबाद राहिला.

वनडेमध्ये विराट कधी होता नंबर 1 ?

विराट कोहलीने एप्रिल 2012 मध्ये वनडे सामन्यांमध्ये पहिले स्थान पटकावले होते. तो 1258 दिवस फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. 2017 ते 2021 एप्रिल पर्यंत तो सलग नंबर 1 फलंदाज होता. त्यानंतर 2021 मध्ये बाबर आझमने त्याला मागे टाकले. विराट कोहलीला पुढच्या वर्षी पुन्हा नंबर फलंदाज बनण्याची संधी मिळेल. टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार असून त्याचा पहिला सामना वडोदरा येथे खेळला जाईल. जर रोहित शर्माने या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत थोडीशीही खराब कामगिरी केली आणि विराट कोहलीने उत्तम धावा केल्या तर विराट हा निश्चितच रोहितचे पहिले स्थान हिसकावून घेऊन नंबर 1 बनू शकतो.