AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट! आज पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस, थेट 7 जिल्ह्यांमध्ये इशारा, पुढील काही तास धोक्याचे…

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशातील हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी पाऊल तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा पावसाचा दिला. आज राज्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यावर मोठं संकट! आज पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस, थेट 7 जिल्ह्यांमध्ये इशारा, पुढील काही तास धोक्याचे...
heavy rain
| Updated on: Mar 15, 2026 | 7:13 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता बघायला मिळत आहे. मार्च महिन्याला सुरूवात झाली. मात्र, तरीही राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. मार्चमध्ये तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे पाऊसही कोसळत आहे. पुढील काही दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात उन्हाचा कडाका कामय असण्याचा अंदाज आहे.

बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आताही पावसाचा इशारा देण्यात आला. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. ज्याने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. सध्याच्या स्थितीत धुळे जिल्ह्यात 39 अंशावर उन्हाचा पारा पोहचला असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले. या उन्हामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. या उन्हाच्या कडाक्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या शेतातील तब्बल 5 एकरातील टरबूज खराब झाले. प्रचंड उन्हाचा फटका टरबूजांना बसल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. टरबूजांना योग्य बाजारभाव मिळाला नाही आणि त्यातच उन्हामुळे संपूर्ण शेतातील टरबूज खराब झाले.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.