विराटचं 40 वं शतक, ‘हे’ पाच विक्रम मोडीत

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या वन डेतील 40 वं शतक ठोकलं. या सामन्यात कांगारुंनी भारताला सर्वबाद 250 धावांत रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता 251 धावांचं लक्ष्य आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 107 चेंडूत धडाकेबाज 116 धावा काढल्या. कोहलीचं हे वन डेतील 40 वं शतक […]

विराटचं 40 वं शतक, ‘हे’ पाच विक्रम मोडीत
Nupur Chilkulwar

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या वन डेतील 40 वं शतक ठोकलं. या सामन्यात कांगारुंनी भारताला सर्वबाद 250 धावांत रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता 251 धावांचं लक्ष्य आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 107 चेंडूत धडाकेबाज 116 धावा काढल्या. कोहलीचं हे वन डेतील 40 वं शतक आहे. या शतकासोबतच कोहलीने तब्बल पाच रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.

विराटचं 40 वं शतक

वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आहे, त्याच्या नावे 71 शतकं आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकाचा माजी विकेटकीपर आणि फलंदाज कुमार संगाकारा आहे. त्याच्या नावे 45 शतकं आहेत. तर आता तिसऱ्या स्थानावर 40 शतकांसोबत विराट कोहली आहे.

विराटने सचिनलाही मागे टाकले

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड तोडला नसला तरी त्याने सामन्यांमध्ये सचिनला मागे टाकले आहे. सचिनने 355 सामन्यांमध्ये त्याचं 40 वं शतक पूर्ण केलं होतं. मात्र, विराटने अवघ्या 216 सामन्यांमध्ये 40 वं शतक पूर्ण केलं आहे.

हेही वाचा : …म्हणून अनुष्का विश्वचषकात विराटसोबत मैदानात येणार नाही!

तीन देशांविरुद्ध सातहून अधिक शतकं

कर्णधार विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने तीन वेगवेगळ्या देशांच्या विरुद्ध सात आणि त्याहून अधिक शतक ठोकले आहेत. विराटने श्रीलंकाच्या विरुद्ध सर्वाधिक आठ शतक ठोकले, तर वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी सात-सात शतक ठोकले.

विराटचे 1000 चौकार पूर्ण

वन डे सामन्यांत सर्वाधिक 1000 चौकार मारण्याच्या बाबतीतही विराटने मजल मारली आहे. या यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि तिसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सहवाग आहे. आज झालेल्या सामन्यात विराटने 10 चौकार ठोकत 1000 चौकारचा रेकॉर्ड केला.

विराट 9000 धावा पूर्ण करणारा सहाव्या क्रमांकाचा खेळाडू

कर्णधार म्हणून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या 159 सामन्यांत 9000 धावा काढल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करणारा विराट जगातील सहाव्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें