WI vs SL, 2nd Odi | एव्हीन लेवीस आणि शाई होपचा तडाखा, वेस्टइंडिजचा श्रीलंकेवर 5 विकेट्सने शानदार विजय, मालिकाही जिंकली

वेस्टइंडिजने (West Indies) 5 विकेट्सने श्रीलंकेवर (Sri Lanka) शानदार विजय मिळवला. यासह विंडिजने मालकाही जिंकली.

WI vs SL, 2nd Odi | एव्हीन लेवीस आणि शाई होपचा तडाखा, वेस्टइंडिजचा श्रीलंकेवर 5 विकेट्सने शानदार विजय, मालिकाही जिंकली
वेस्टइंडिजने (West Indies) 5 विकेट्सने श्रीलंकेवर (Sri Lanka) शानदार विजय मिळवला. यासह विंडिजने मालकाही जिंकली.

अँटिगा : वेस्टइंडिजने श्रीलंकेवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (West Indies vs Sri Lanka) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. यासह विंडिजने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विंडिजला विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान विंडिजने 5 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. विडिंजकडून एवीन लेव्हीलसने (Evin Levis) सर्वाधिक 103 धावा केल्या. तर शाई होपने 84 धावांची (Shai Hope) खेळी केली. तर श्रीलंकेकडून नुवन प्रदीप आणि थिसारा परेरा या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (West Indies beat Sri Lanka by 5 wickets in 2nd ODI)

शानदार सलामी भागीदारी

विजयी आव्हानांचे पाठलाग करायला आलेल्या विंडिजची शानदार सुरुवात राहिली. लेव्हीस आणि होप या सलामी जोडीने 192 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी तुफानी फलंदाजी केली. मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या पार्टनरशीप दरम्यान लेव्हीसने शतक तर शाई होपने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र विंडिजला 192 स्कोअर असताना पहिला धक्का बसला. लेव्हिस स्टंपिंग आऊट झाला. लेव्हिसने 121 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 103 धावांची खेळी केली. लेव्हीसनंतर होपही आऊट झाला. होपने 108 बोलमध्ये 6 फोरसह 84 धावा चोपल्या.

विंडिजने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यामुळे विंडिजची 194-2 अशी स्थिती झाली. पण या दोघांनी केलेल्या शानदार भागीदारीने विंडिजच्या विजयाच्या पाया रचला.

त्यानंतर विंडिजने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. डॅरेन ब्राव्हो, कर्णधार कायरन पोलार्ड आणि फॅबियन एलन हे स्वसतात आऊट झाले. त्यामुळे विंडिजची 249-5 अवस्था झाली. पण त्यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डर या जोडीने विंडिजला विजय मिळवून दिला. पूरनने 38 चेंडूत 4 चौकारांसह 35 धावांची निर्णायक खेळी केली.

श्रीलंकेची फलंदाजी

त्याआधी विंडिजने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडले. लंकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 273 धावा केल्या. लंकेकडून दनुष्का गुनथालिकाने सर्वाधिक 96 रन्स केल्या. तर दिनेश चांदिमालने 71 धावा केल्या. विंडिजकडून जेसन मोहम्मदने 3 विकेट्स मिळवल्या. तर अलझारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या.

विंडिजने मालिका जिंकली

विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-o ने आघाडी घेतली. यासह विंडिजने मालिकाही जिंकली. दरम्यान मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Yuzvendra Chahal | युझवेंद्र चहलची विक्रमाला गवसणी, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli | कर्णधार विराट कोहलीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, ‘या’ बाबतीत गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक

(West Indies beat Sri Lanka by 5 wickets in 2nd ODI)

Published On - 10:57 am, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI