शुबमनचं सारासोबत लग्न कधी होणार, उत्तर मिळालं! शुबमनचे वडील हसले अन्…
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा होते. ते लग्न कधी करणार, असे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला आहे. दरम्यान, आता शुबमनच्या वडिलांना या दोघांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले आहे.

shubman gill and sara tendulkar marriage : अभिनेत्रा, अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. याच उत्सुकतेपोटी अनेक सेलिब्रिटिंचे नाते हेदेखील खासगी राहात नाही. अनेकांची अफेअर्स, प्रेमकरणं समोर येतात. यात क्रिकेटर शुबमन गिल आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हेही वाचले नाहीत. हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. ते दोघेही अनेकदा सोबत स्पॉट झालेले आहेत. असे असतानाच आता शुबमन गिलच्या वडिलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी शुबमन आणि सारा तेंडुलकरच्या लग्नावर दिलेल्या रिअॅक्शनची सगळीकडेच चर्चा होत आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या समोर आलेला एक व्हिडीओ क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे. हा सामना पाहण्यासाठी शुबमन गिलचे वडील लखविंदर सिंह हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या बाजूला एक लहान मुलगा भारतीय क्रिकेट संघाची जर्सी परिधान करून बसलेला आहे. तर दुसरीकडे शुबमनचे वडील पांढरे शुभ्र कपडे घालून सामना पाहात आहेत. त्यांचा व्हिडीओ क्रिकेट पाहायला आलेल्या एका क्रिकेट चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.
View this post on Instagram
थेट विचारलं सारा, शुबमनचं लग्न कधी लावून देणार?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत समोरची व्यक्ती अंकलजी शुबमन गिलचे लग्न कधी लावून देणार, असे थेट विचारताना दिसत आहे. समोरच्या या व्यक्तीच्या प्रश्नानंतर शुबमनच्या वडिलांनी फक्त हात वर केला आहे. देवाच्या मनात जेव्हा येईल, तेव्हा लग्न होईल असे शुबमनच्या वडिलांनी इशाऱ्यानेच सांगितले आहे. त्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीने शुबमनचे लग्न सारा तेंडुलकरसोबत करणार का? असा दुसरा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाकडे मात्र शुबमनच्या वडिलांनी दुर्लक्ष केले आहे. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Fans at Eden Garden are asking Lakhwinder uncle about when Shubman Gill will get married. 😭😭 pic.twitter.com/7kGXMH4gwP
— Ahmed Says (@AhmedGT_) November 14, 2025
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सारा आणि शुबमन यांच्या नात्याची वेळोवेळी चर्चा होते. अनेकदा वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये ते एकत्र दिसलेले आहेत. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्यावर कुठेही जाहीरपणे भाष्य केलेले नाही. असे असताना आता भविष्यात खरंच हे दोघे लग्न करणार का? हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
