Video : ‘मिसेस बुमराह’ इज बॅक, ‘सध्याचा तुझा फेवरेट खेळाडू कोण?’ अफलातून रॅपिड फायर राऊंड तुम्ही बघितलात?

Video : 'मिसेस बुमराह' इज बॅक, 'सध्याचा तुझा फेवरेट खेळाडू कोण?' अफलातून रॅपिड फायर राऊंड तुम्ही बघितलात?
Sanjana Ganesan

जसप्रीत मैदानावर आपलं बहारदार प्रदर्शन देतोय तर संजना स्टुडिओमध्ये बसून क्रिकेट सामन्यांचं मोठ्या नजाकतीने आणि खुमासदार शैलीत वर्णन करतीय. (Who is Your favourite Cricketer Sanjana Ganesan Rapid Fire Round IPL 2021) 

Akshay Adhav

|

Apr 11, 2021 | 3:12 PM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वाची (IPL 2021) धूम सुरु आहे. आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांनी रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं आहे. मैदानावरील प्रत्येक शॉट्स, कॅच, स्टम्पिंग प्रेक्षक डोळ्यात तेल घालून बघत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूंना फॉलो करत असतात. मग जर आवडत्या खेळाडूची पत्नी अँकर असेल आणि ती ही क्रिकेट कॉमेंटेटर…! आम्ही सांगतोय जगातील सगळ्यात घातक यॉर्कर किंग आणि मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची नवोदित पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्याबद्दल… जसप्रीत मैदानावर आपलं बहारदार प्रदर्शन देतोय तर संजना स्टुडिओमध्ये बसून क्रिकेट सामन्यांचं मोठ्या नजाकतीने वर्णन करतीय. ज्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरुन आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण होतंय त्याच स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडीओ ट्विट केलाय ज्या व्हिडीओत संजना गणेशन हिच्याबरोबर अफलातून रॅपिड फायर राऊंड खेळला गेला. आपण पाहूयात तिला कोणते प्रश्न विचारले गेले आणि तिने काय उत्तरं दिली… (Who is Your favourite Cricketer Sanjana Ganesan Rapid Fire Round IPL 2021)

प्रश्न 1- या आयपीएल मोसमात तू कशाकडे बघतेस किंवा सगळ्यात जास्त कशाची वाट बघतेस?

उत्तर- आयपीएल खूप सारा उत्साह घेऊन येतो. मी सगळ्या सुवर्ण क्षणांची वाट पाहतीय.

प्रश्न 2- तुझे क्रिकेटमधील नायक कोण आहेत?

उत्तर- ब्रेट ली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी

प्रश्न 3- तुझे आवडते क्रिकेट कॉमेंटेटर कोण आहेत?

उत्तर- माझे आवडते कॉमेंटेटर सुनील गावस्कर आहेत.

प्रश्न 4- तुझा आवडता सर्वोत्तम बेस्ट खेळाडू कोण आहे?

उत्तर- प्रश्न अवघड आहे. पण महेंद्रसिंग धोनी…

प्रश्न 5- कोणत्या क्रिकेटरला भेटताना तू नर्व्हस झालीस किंवा होतेस? 

उत्तर- महेंद्रसिंग धोनी (हसून उत्तर दिलं)

प्रश्न 6- ग्रीन रुममधला फनी खेळाडू कोण?

उत्तर- ग्रॅम स्वान

प्रश्न 7- यावर्षीचं आयपीएल जेतेपद कोण पटकवणार?

उत्तर – कोलकाता नाईट रायडर्स (एकदम हळू आवाजात)

हे उत्तर कदाचित जसप्रीतला मान्य नसेल, संजनाचं उत्तर ऐकून बुमराहच्या पोटात नक्की दुखेल तसंच मुंबईचं नाव का घेतलं नाही, असा प्रश्नही त्याला पडल्यावाचून राहणार नाही. 

प्रश्न 8- इथे काम करताना सगळ्यात चांगली गोष्ट कोणती?

उत्तर- सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. इथली माणसं, इथलं वातावरण

प्रश्न 9- तू पाहिलेली किंबहुना लक्षात राहिलेली पहिली मॅच आठवतीय?

उत्तर- 2003 ची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकातला अंतिम सामना. हृदयाची धडधड वाढवणारा सामना पण मला तो क्षण-मॅच आठवतीय. 

प्रश्न 10- सध्याचा तुझा आवडता खेळाडू?

उत्तर- तुम्हाला याचं उत्तर माहितीय (थोडीशी लाजून)… म्हणजेच तिला जसप्रीत बुमराहचं नाव घ्यायचं आहे.

प्रश्न 11- तुझं रोजचं रुटीन काय असतं?

उत्तर- गाणी ऐकणं, होमवर्क करणं, 

प्रश्न 12- या स्टुडिओमधलं असं कोणतं सिक्रेट आहे जे लोकांना सांगायला आवडेल?

उत्तर- या  रुममधलं वातावरण खूपच थंड आहे अगदी फ्रिजिंग…

प्रश्न 13- तू काम केलेलं पहिलं टूर्नामेंट किंवा स्पर्धा

उत्तर- आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्डकप 2016

प्रश्न 14- पहिल्यांदा बॅटिंग करुन लक्ष्याचा बचाव करावा की पहिल्यांचा फिल्डिंग करुन रन्स चेस कराव्या?

उत्तर – पहिल्यांदा फिल्डिंग करावी आणि नंतर लक्ष्य गाठावं.

(Who is Your favourite Cricketer Sanjana Ganesan Rapid Fire Round IPL 2021)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

IPL 2021 : लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच, अँकरिंग करताना अंगावर निळा ड्रेस, बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज!’

Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराहची आजपासून नवी इनिंग, स्टार अँकरसोबत लगीनगाठ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें