ऑस्ट्रेलियात धडाकेबाज कामगिरी, मात्र इंग्लंडविरुद्ध संधीच नाही, महाराष्ट्राच्या खेळाडूला डच्चू

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे

ऑस्ट्रेलियात धडाकेबाज कामगिरी, मात्र इंग्लंडविरुद्ध संधीच नाही, महाराष्ट्राच्या खेळाडूला डच्चू

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Why Shardul Thakur released from Indian test team for England series)

जलदगती गोलंदाज उमेश यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. उमेश ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. दरम्यान तो आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. फिटनेस टेस्टनंतर उमेश मैदानात उतरेल. उमेशला संधी देताना निवड समितीने जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला संघातून वगळलं आहे. शार्दुलच्या जागी उमेश असा एकमेव बदल भारतीय संघात करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंपैकी मोहम्मद शमी, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी यांच्यापैकी कोणताही खेळाडू अद्याप संघात पुनरागमन करु शकलेला नाही. दरम्यान, एकही संधी न देता शार्दुलला संघातून वगळणं अनेकांना पटलेलं नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. शार्दुल ठाकूर या सामन्याचा हिरो ठरला होता. भारताची फलंदाजी ढेपाळल्यानंतर शार्दुल ठाकूरने आक्रमक अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावला होता. तर या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने चार कांगारुंना बाद करत भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं होतं. मिळालेल्या संधीचं सोनं करुनही शार्दुलला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दुसऱ्या बाजूला शार्दुलला आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy 2o21) मुक्त करण्यात आलं आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

5 नेट्स गोलंदाज

निवड समीतीने या उर्वरित 2 कसोटींसाठी 5 नेट्स गोलंदाजांसह २ राखीव खेळांडूना स्थान दिलं आहे. नेट्स बोलर्समध्ये संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, अंकित राजपूत, आवेश खान आणि सौरभ कुमारचा समावेश आहे. तर रिझर्व्ह प्लेअर्समध्ये केएस भरत आणि राहुल चाहरचा समावेश आहे. तर अभिमन्यू इश्वरन, प्रियांक पांचाल आणि शाहबाज नदीमला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त केलं आहे.

तिसरी कसोटी 24 फेब्रुवारीपासून

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24-28 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा डे नाईट सामना असणार आहे. गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

मालिका बरोबरीत

4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील प्रत्येकी 1 सामना इंग्लंड आणि टीम इंडियाने जिंकला आहे. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा कसोटी सामना हा या मालिकेच्या दृष्टीने चुरशीचा असणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया 

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

नेट बोलर |  संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार, अंकित राजपूत आणि आवेश खान.

रिझर्व्ह प्लेअर्स | केएस भरत आणि राहुल चाहर.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम :

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप

India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत

(Why Shardul Thakur released from Indian test team for England series)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI