RCB Champion : आयपीएल 2025 ची चॅम्पियन टीम आरसीबीची होणार विक्री? मोजावे लागतील इतके हजार कोटी, वाचा संपूर्ण बातमी
जर RCB ची टीम इतक्या मोठ्या किंमतीत विक्री झाली तर ही IPL च्या इतिहासातील सर्वात मोठी डील ठरेल. यापूर्वी लखनऊचा संघ RPSG ग्रुपने 7,090 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

Royal Challengers Bengaluru Team Owner Sale Franchise : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात आयपीएल 2025 (IPL 2025) चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विक्री होत आहे. आता आरसीबी टीमचे मालक मॅकडॉवल्स व्हिस्की तयार करणारी कंपनी युनायटेड स्पिरिट लिमिटेड आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, स्पिरिट लिमिटेड आरसीबी विक्रीच्या तयारीत आहे. जर RCB संघाची विक्री होत असेल तर आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा ठरेल. कारण आरसीबी मालकाने संघ विक्रीसाठी एक बंपर किंमत ठेवली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड कंपनीने 2 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 17 हजार कोटी रुपयांमध्ये आरसीबी विक्री करण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी युनायटेड स्पिरिट लिमिटेड ही कंपनी विजय माल्या यांची होती. विजय माल्या दिवाळखोरीत गेल्यावर ही कंपनी इंग्लंडच्या डियाजियो कंपनीने खरेदी केली होती. आता डियाजियो हीच कंपनी आरसीबीची मालक आहे.
2008 मध्ये इतके रुपये होती RCB ची किंमत




आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. त्यावेळी आरसीबीची किंमत 111.6 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 476 कोटी रुपये होती. त्यावेळी आरसीबी ही दुसरी सर्वात महागडी टीम होती. विजय माल्याने त्याची कंपनी युनायटेड स्पिरिट लिमिटेडला आरसीबीची मालकी दिली होती. 2014 मध्ये ब्रिटिश कंपनी डियाजियोने यूनाइटेड स्पिरिट लिमिटेडचा एक मोठा हिस्सा खरेदी केला आणि 2016 मध्ये कंपनीने पूर्ण आरसीबीच खरेदी केली होती.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा
आरसीबीची टीम 17 हजार कोटी रुपयांना विक्री झाली तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा ठरेल. यापूर्वी कोणताच संघ इतक्या मोठ्या किंमतीला विक्री झालेला नाही. जेव्हा आयपीएलमध्ये दोन नवीन संघ आले. तेव्हा लखनऊ सुपर जायंटसला RPSG ग्रुपने 7,090 कोटी रुपयांत खरेदी केले होते. CVC कॅपिटलने 5,625 कोटी रुपयांत गुजरात टायटन्सला खरेदी केले होते. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, स्पिरिट लिमिटेड आरसीबी विक्रीच्या तयारीत आहे. जर RCB संघाची विक्री होत असेल तर आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा ठरेल. कारण आरसीबी मालकाने संघ विक्रीसाठी एक बंपर किंमत ठेवली आहे.