Irfan Pathan : पाकिस्तान विरुद्ध मॅच हरल्यानंतर इरफान पठाणने दाखवला मनाचा मोठेपणा, पण घडलं उलटच, मोठा वाद
Irfan Pathan : गुरुवारी 22 जानेवारीला भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मॅच झाली. पाकिस्तानने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये 56 धावा फटकावल्या. शोएब मलिक आणि इमरान नजीर यांनी स्फोटक बॅटिंग केली.

भारत-पाकिस्तानचे संबंध आधीपासूनच खराब आहेत. पण मागच्या वर्षभरात ते अजून बिघडले आहेत. राजकीय आणि सैन्य तणावाचा परिणाम खेळावरही दिसून येतोय. खासकरुन क्रिकेटच्या मैदानात स्थिती जास्त गंभीर दिसली. ICC आणि ACC टुर्नामेंट सोडल्यास दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका अनेक वर्षांपासून बंदच आहे. आता हस्तांदोनल न करण्याचा नवीन ट्रेंड सुरु झालाय. या सगळ्यामध्ये टीम इंडियाचे माजी ऑलराऊंडर इरफान पठान आणि स्टूअर्ट बिन्नी हे वादात सापडले आहेत. कारण भारत-पाकिस्तानमध्ये एक सामना झाला. मॅच संपल्यानंतर दोघे पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करताना, गळाभेट घेताना दिसले. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
सौदी अरेबियात जेद्दा येथे वर्ल्ड क्रिकेट फेस्टिवलमध्ये डबल विकेट टुर्नामेंटच आयोजन करण्यात आलं आहे. यात भारत आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू सुद्धा सहभागी झालेत. गुरुवारी 22 जानेवारीला भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मॅच झाली. पाकिस्तानने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये 56 धावा फटकावल्या. शोएब मलिक आणि इमरान नजीर यांनी स्फोटक बॅटिंग केली.
Thrilling finish at the World Cricket Festival in Jeddah! 🇵🇰 Shoaib Malik & Imran Nazir powered Pakistan to a nail-biting 5-run victory over India in the Festival Double Wicket clash.
They outshone Irfan Pathan & Stuart Binny in a display of veteran class. Post-match… pic.twitter.com/TvSwCt08mL
— HAMAS 🇵🇰 (@HamasulGhani) January 22, 2026
त्याची चर्चा जास्त
प्रत्युत्तरात भारताचा कॅप्टन इरफान पठाण आणि स्टूअर्ट बिन्नीची जोडी 4 ओव्हरमध्ये 51 धावाचं करु शकली. यात 49 धावा एकट्या पठाणने बनवल्या. बिन्नी आपलं खातही उघडू शकला नाही. पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला. मात्र, सामन्याच्या निकालापेक्षा मैदानावर नंतर जे दिसलं, त्याची चर्चा जास्त आहे.
.@narendramodi ji ye daikhain Irfan Pathan kese Pakistanio sai jhappian daal raha… pic.twitter.com/2gtsLvdOub
— Usama Zafar (@Usama7) January 22, 2026
इरफान पठाण ट्रोल
मॅच संपल्यानंतर इरफान पठाण आणि बिन्नीने शोएब मलिकला हात मिळवला. गळाभेट घेतली. यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीममधील खेळाडूंनी परस्परांशी हँडशेक केलं. आधी हे असच व्हायचं. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान पहिल्यांदा आमने-सामने आले. त्यावेळी भारतीय टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणं टाळलं होतं. आता इरफान पठाण आणि स्टूअर्ट बिन्नी यांनी मात्र असं केलं नाही. त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच पाकिस्तानी युजर्सनी यावरुन इरफान पठाणला ट्रोल केलं.
