युवी आणि बायकोनं माझं घर सोडलं आणि… स्वतःला पापी म्हणत युवराज सिंह याच्या वडिलांचा मोठा खुलासा
Yuvraj Singh Fatehr Yograj Singh : लहानपणापासून वडिलांच्या घरात का नाही राहात युवराज सिंह आणि त्याची आई? वडील दुःख व्यक्त करत म्हणाले, 'युवी आणि बायकोनं माझं घर सोडलं आणि...'

Yuvraj Singh Fatehr Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराय सिंह याचे वडील योगराज सिंह गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहेत. सांगायचं झालं तर, आज क्रिकेट विश्वात युवराज याने जे नाव कमावलं आहे, त्यामागे वडील योगराज यांचं मोठं योगदान आहे… युवराज याने क्रिकेटपटू म्हणून स्वतःचं नाव मोठं करावं.. अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि युवीने ती पूर्ण देखील केली… पण युवराज लहानपणापासून वडिलांपासून दूर राहत आहे. याचा खुलासा खुद्द वडील योगराज यांनी केलेला.
एका मुलाखतीत योगराज यांनी मनातील खंत व्यक्त केली होती. योगराज यांचं संपूर्ण आयुष्य तेव्हा बदललं जेव्हा, मुलगा युवराज याने तारुण्यात वडिलांना सोडून आई शबनम सिंह यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. योगराज यांनी खुलासा केला की, जेव्हा युवराजने भारतासाठी पदार्पण केलं तेव्हा, ते तुरुंगात होते, परंतु योगराज यांचा आपल्या मुलाला एक महान क्रिकेटपटू बनवण्याचा दृढनिश्चय होता.
योगराज म्हणाले, जेव्हा त्यांची पूर्व पत्नी आणि युवराज त्याचं घर सोडून गेले तेव्हा ते पूर्णपणे एकटेच पडले आणि त्याचं आयुष्य आणखीनच नियंत्रणाबाहेर गेलं… ‘मी एक पापी आहे… मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. माझं संपूर्ण आयुष्य फक्त मी अडचणी सहन केल्या आहे. ज्या दिवशी युवी आणि त्याची आई मला सोडून गेले, तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.. पण कदाचित तेच व्हायचं असेल. मला धडा शिकवण्यासाठी देवाने हे सर्व केलं असेल…’ असं देखील युवीचे वडील योगराज म्हणाले.
युवराज महिन्याला वडिलांना देतो पैसे…
योगराज सिंग यांनी युवराज याच्या आईला घटस्फोट दिल्यानंतर पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल यांच्यासोबत लग्न केलं. नीना बुंदेल आणि योगराज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा विक्टर अभिनय विश्वात सक्रिय आहे, तर मुलगी अमरजीत कौर रॅकेट प्लेयर आहे… पूर्वी ती टेनीस खेळायची… सावत्र भावंडांसोबत युवीचे चांगले संबंध आहेत. तर, युवराज प्रत्येक महिन्याला वडिलांना 50 हजार रुपये देतो… असा खुलासा खुद्द त्यांच्या वडिलांनी केलेला.
