Yuvraj Singh | 'सिक्सर किंग' युवराज सिंहकडून निवृत्तीची घोषणा

युवराज सिंहने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत युवराज निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

, Yuvraj Singh | ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहकडून निवृत्तीची घोषणा

Yuvraj Singh मुंबई : क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ ऐन भरात आला असताना, भारतीय चाहत्यांना काहीशी निराशाजनक बातमी आहे. टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहने निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराज सिंहने आज पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा केली.

निवृत्तीची घोषणा करण्याआधी युवराज सिंहच्या आयुष्यावर आधारित माहितीपट दाखवण्याता आला. युवराजचे आई-वडील हेही या माहितीपटात दिसले. युवराजचा लहानपणापासूनचा आतापर्यंतचा प्रवास या माहितीपटातून दाखवण्यात आला.

टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त काही आठवड्यापूर्वीच आलं होतं. युवराज सिंह सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र, आयपीएलमध्ये केवळ त्याला चार सामन्यातच खेळता आलं. तर भारतीय संघात तो शेवटचा 2017 मध्ये दिसला होता. युवराज सिंह हा जगभरात प्रसिद्ध असलेल्या टी 20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत होता. बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडू निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे युवराज सिंहने जर परदेशी टी 20 लीगमध्ये सहभागी होण्याची तयारी केली असेल, तर त्याला भारतात निवृत्ती जाहीर करावी लागणार होती.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला माहिती दिली होती की, “युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. तो बीसीसीआयशी याबाबत बातचीत करु इच्छित आहे. शिवाय आयर्लंड आणि हॉलंडमध्ये जीटी 20 (कॅनडा), युरो टी 20 यासारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे. तसा प्रस्ताव त्याने पाठवला आहे”.

भारतीय खेळाडूंना बाहेरील टी 20 स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयला नियमांची चाचपणी करावी लागते. अधिकाऱ्यांनुसार, युवराज निवृत्ती घेऊन तो बाहेरील स्पर्धांमध्ये सहभागी झाला, तरी तो भारतीय खेळाडू म्हणूनच गणला जाईल.

युवराज सिंहची क्रिकेट कारकीर्द

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या 

 सिक्सर किंगने मन बनवलं, युवराज सिंह निवृत्तीची घोषणा करणार!  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *