दिवाळीसाठी शॉपिंग लिस्ट तयार करा, फ्लिपकार्टचा नवा सेल येतोय

फेस्टिव्ह सीजन सुरु होतोय, या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळे ऑनलाईन सेल आणून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करत आहेत.

दिवाळीसाठी शॉपिंग लिस्ट तयार करा, फ्लिपकार्टचा नवा सेल येतोय

मुंबई : फेस्टिव्ह सीजन सुरु होतोय, या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळे ऑनलाईन सेल आणून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करत आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल नुकताच संपला, त्याचबरोबर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्यात आली. आता दिवाळी येत आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्याकडे खरेदी करावी यासाठी फ्लिपकार्ट नवा सेल सुरु करत आहे. (Big Diwali sale : flipkart coming up with new sale)

दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टचा बिग दिवाली सेल 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने जास्तीत जास्त 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर्स दिल्या आहेत. याबाबत फ्लिपकार्टने म्हटलं आहे की, या सेलमध्ये दररोज नवीन प्रोडक्ट्स असतील. 28 ऑक्टोबर रात्री 12 ते 29 ऑक्टोबर दुपारी 12 वाजेपर्यंत या वेळेत फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना मोठ्या ऑफर्स देण्यात येणार आहेत. 29 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी खुला होईल.

या सेलमध्ये डिस्टाऊंटसह विविध बँकांच्या ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत. काही बँकांकडून ठराविक वस्तूंवर नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही ग्राहकांना मिळणार आहे. क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास किंवा EMI ट्रांजॅक्शन्सवर अधिक 10 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळेल.

स्मार्टफोन आणि टीव्ही – फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेलमध्ये Samsung Galaxy F41, Galaxy S20+, Galaxy A50s, Oppo Reno 2F, Oppo A52, Oppo F15,Poco M2, Poco M2 Pro, Poco C3, Realme Narzo 20 सीरीजच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. यासोबतच फ्लिपकार्टकडून केवळ 1 रुपयामध्ये मोबाईल प्रोटेक्शन दिलं जाणार आहे. फ्लिपकार्टने म्हटलं आहे की, रात्री 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर शानदार डिल्स देण्यात आल्या आहेत.

गॅजेट्सवर डिस्काऊंट – या सेलमध्ये कॅमेरा, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि हेडफोन्ससारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला आहे. काही लॅपटॉपवर 50 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. हेडफोन, स्पीकरसारख्या गॅजेट्सवर 80 टक्के ऑफर देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

भारतात iPhone 12, iPhone 12 Pro साठी प्री-बुकिंग सुरु, Apple ने ऑफर्सचा पेटारा उघडला

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

(Big Diwali sale : flipkart coming up with new sale)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *