VIVO स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 11,000 रुपयांची सूट

VIVO या स्मार्टफोन कंपनीने ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. त्याप्रमाणे वीवोच्या अनेक स्मार्टफोनवर तब्बल 11,000 पर्यंतची मोठी सूट मिळेल.

VIVO स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 11,000 रुपयांची सूट

नवी दिल्ली : VIVO या स्मार्टफोन कंपनीने ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. 6 जून ते 8 जून दरम्यान चालणाऱ्या वीवोच्या कार्निवल सेलमध्ये ही ऑफर उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये वीवोच्या अनेक स्मार्टफोनवर तब्बल 11,000 पर्यंतची मोठी सूट मिळेल.

वीवोच्या या कार्निवल सेलमध्ये एक्सचेंज ऑफर्स आणि नो कॉस्ट ईएमआय या सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.

वीवो V15

या स्मार्टफोनवर 7,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. या फोनची मुळ किंमत 26 हजार 990 रुपये आहे. सूट मिळाल्यानंतर या फोनला 19 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 12MP+8MP+5MP असा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमरा आहे.

वीवो V9

वीवो V9 स्मार्टफोनवर कंपनीने 11,000 रुपयांची सूट दिली आहे. ही सवलत मिळाल्याने 23,990 रुपयांचा हा फोन केवळ 12,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसह 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे.

वीवो V15 प्रो

या स्मार्टफोनची मुळ किंमत 32,990 रुपये आहे. सेलमधील सूट लक्षात घेता V15 प्रो 26,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर 6,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो Y17

कार्निवल सेलमध्ये या फोनवर 3,000 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे 18,990 रुपयांचा हा फोन 15,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 13MP+8MP+2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

वीवो Y17

वीवो Y17 स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट आहे. 11,990 रुपयांचा हा फोन सवलतीच्या दरात 6,990 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *