35 लाख Mobikwik युजर्सचा डेटा लीक, फोन नंबर, आधार आणि KYC डेटाची विक्री?

एका सिक्योरिटी रिसर्चरने असा दावा केला आहे की, 3.5 मिलियन Mobikwik या पेमेंट अ‍ॅपवरील युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे.

35 लाख Mobikwik युजर्सचा डेटा लीक, फोन नंबर, आधार आणि KYC डेटाची विक्री?
Mobikwik
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:51 PM

मुंबई : एका सिक्योरिटी रिसर्चरने असा दावा केला आहे की, 3.5 मिलियन Mobikwik या पेमेंट अ‍ॅपवरील युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. तेव्हापासून मोबिक्विक कंपनी संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. जो डेटा डार्क वेबवर विकला जातोय, त्यामध्ये युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश असल्याने खळबळ उढाली आहे. 35 लाख युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये केवायसीची (KYC) माहिती, पत्ता, फोन नंबर, आधार कार्डचा तपशील आणि इतर महत्त्वाची माहिती विकली जात असल्याचे वेगवेगळे दावे समोर आले आहेत. (3.5 million Mobikwik users data leaked, users address, Aadhaar data, phone number and KYC being sold here)

दरम्यान, बर्‍याच युजर्सना त्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर व्हायरल होत आहे, याची जाणीव झाली आहे. सुरक्षा संशोधक (सिक्योरिटी रिसर्चर) राजशेखर राजाहरिया यांनी या डेटा ब्रीचबद्दलची माहिती सर्वात आधी फेब्रुवारीमध्ये सादर केली होती. 1 कोटी भारतीय कार्डधारकांचा वैयक्तिक डेटा आणि केवायसी सॉफ्ट कॉपी (पॅन, आधार इ.) यांचा समावेश असलेल्या कंपनीचा डेटा कंपनीच्या सर्व्हरमधून भारतात लीक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

TechNadu च्या अहवालानुसार, ईमेल आयडी, फोन नंबर, पासवर्ड अ‍ॅप्लिकेशन इंस्टॉल, फोन निर्माता, आयपी अ‍ॅड्रेस, जीपीएस स्थान आणि वापरकर्त्यांची इतर माहिती लीक झाली आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, कथित विक्रेत्याने डार्क वेब पोर्टल स्थापित केले आहे “जिथे एखादी व्यक्ती फोन नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे माहिती शोधू शकतो, त्यासाठी त्याच्यासमोर एकूण 8.2 टीबी डेटा उपलब्ध आहे.

डार्क वेबवर Mobikwik युजर्सच्या डेटाचे स्क्रीनशॉट?

कंपनीने फेब्रुवारी महिन्यात राजशेखर यांचा दावा फेटाळला होता, परंतु सोमवारी डार्क वेबची लिंक ऑनलाइन पाहावसाय मिळाली. युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती डार्क वेबवर पाहिल्याचा दावा केला आहे. बर्‍याच युजर्सनी मॉबिक्विकच्या डेटाचे स्क्रीनशॉटही पोस्ट केलेत, जे डार्क वेबवर विकले जात होते. अहवालानुसार, डेटा 1.5 बिटकॉईन्स किंवा सुमारे 86,000 डॉलर्समध्ये विकला जात होता. तथापि, मोबिक्विकने राजशेखर राजाहरिया यांनी केलेले दावे स्पष्टपणे नकारले आहेत.

कंपनीने दावे फेटाळले

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “काही माध्यमांनी, तथाकथित सुरक्षा संशोधक, सिक्योरिटी रिसर्चर्सनी वारंवार आमच्या संस्थेचा मौल्यवान वेळ आणि मीडिया सदस्यांचा वेळ वाया घालवणाऱ्या बनावट फाइल्स सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कसून तपासणी केली आहे, तसेच सुरक्षेची काळजी घेतली आहे. आम्ही आमच्या युजर्सना आश्वस्त करु इच्छितो की त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे.”

इतर बातम्या

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(3.5 million Mobikwik users data leaked, users address, Aadhaar data, phone number and KYC being sold here)

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.