व्हॉट्सअॅपवर पॉर्न व्हिडीओ शेअर केल्यास 7 वर्षांची जेल

व्हॉट्सअॅपवर पॉर्न व्हिडीओ शेअर केल्यास 7 वर्षांची जेल

मुंबई : व्हॉट्सअॅपवर वाढत्या चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी आणण्यासाठी भारत सरकार कठोर पावलं उचलत आहे. सरकार यावर लवकरच कायदा आणू पाहत आहे. जर हा कायदा समंत झाला, तर व्हॉट्सअॅप येणारा कोणताही अश्लील व्हिडीओ किंवा मेसेज जर तुम्ही डाउनलोड करुन इतरांना फॉरवर्ड केल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

वृत्तांनुसार, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स कायद्यांतर्गत हा नवीन कायदा करु पाहत आहे. हा लागू झाल्यानंतर चाईल्ड पोर्नोग्राफी शेअर करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा कायद्याला लागू होण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने याला अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात यावर कॅबिनेट बैठक बोलवली असून यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सोशन नेटवर्किंगमध्ये साईटमध्ये व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम आहे. व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफी(अश्लील व्हिडीओ) शेअर केले जातात, ही बाब एका सर्वेक्षणात समोर आली आहे.

हे थांबवण्यासाठी सरकार चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी आणू पाहत आहे. जर कायदा समंत झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर येणारा पोर्नोग्राफी व्हिडीओ डाऊनलोड आणि शेअर केला, तर या कायद्यांतर्गत तुम्हाला कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

पंतप्रधान कार्यालयाकडूनही चिंता व्यक्त

पोर्नोग्राफिच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान कार्यालयाने याआधीच चिंता व्यक्त केली आहे. पोर्नोग्राफी एक गंभीर समस्या असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी देखील चाईल्ड पोर्नोग्राफीमुळे समाजात वाढणाऱ्या गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली आहे. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI