AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 पैकी 80 लोकांना माहितच नाही Airplane Mode चे ‘हे’ 5 फीचर्स, जाणून घ्या त्याचे फायदे

आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन मोड असतो. ज्याचा वापर जास्त करून विमान प्रवासादरम्यान करतात. पण त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जे अनेकांना माहित नाहीये. चला तर मग आजच्या या लेखात एअरप्लेन मोडचे 5 फीचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात...

100 पैकी 80 लोकांना माहितच नाही Airplane Mode चे 'हे' 5 फीचर्स, जाणून घ्या त्याचे फायदे
Flight ModeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 1:29 AM
Share

आजकाल वाढत्या तंत्रज्ञांमुळे तुम्हाला लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतील. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये काही वेगळे फीचर्स असतात. तर प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन मोड असतोच. तर या एअरप्लेन मोडबद्दल बोलायचे झाले तर आजही अनेकांना वाटते की हा मोड फक्त विमान प्रवासादरम्यानच उपयुक्त आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की हा मोड तुमच्या दैनंदिन जीवनातही मोठी कामे सोपी करू शकतो.

हा मोड डिव्हाइसचे सर्व वायरलेस कनेक्शन जसे की नेटवर्क, वाय-फाय आणि ब्लूटूथ तात्पुरते बंद करतो. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतोच, पण त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला या एअरप्लेन मोडचे असे 5 स्मार्ट वापर सांगणार आहोत, ज्याबद्दल आजही 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही…

मोबाईल लवकर चार्ज होईल

जर तुमचे डिव्हाइस खूप हळू चार्ज होत असेल तर हा मोड तुम्हाला खूप मदत करू शकतो. जर तुम्हाला तुमचे डिव्हाइस जलद चार्ज करायचे असेल तर चार्जिंग दरम्यान फोनचा एअरप्लेन मोड चालू ठेवा. असे केल्याने, बॅकग्राउंडमध्ये चालू असलेली नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटी पूर्णपणे बंद होईल. यामुळे फोनचा चार्जिंग स्पीड देखील वाढेल.

बॅटरी देखील वाचवेल

जर तुम्ही अशा भागात असाल जिथे नेटवर्क कमी असेल, तर फोन सतत सिग्नल सर्च करत राहतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू लागते. तथापि अशा परिस्थितीतही तुम्ही एअरप्लेन मोड चालू करून बॅटरी वाचवू शकता.

लक्ष केंद्रित करण्यास मदत करते

फोन मध्ये येणाऱ्या सततच्या नोटिफिकेशनमुळे तुम्ही काही महत्त्वाचे काम करत असाल किंवा अभ्यास करताना लक्ष केंद्रित होत नाही. तर अशावेळेस तुम्ही एअरप्लेन मोड वापरू शकता. कधीकधी नोटिफिकेशन्स तुमचे लक्ष विचलित करतात. अशा परिस्थितीत एअरप्लेन मोड देखील तुम्हाला खूप मदत करू शकतो. एकदा तुम्ही ते चालू केले की, तुम्हाला कोणताही कॉल येणार नाही किंवा कोणताही मेसेज तुम्हाला त्रास देणार नाही.

तुमच्या मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवते

जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या फोनवर गेम खेळताना इंटरनेटपासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही त्यांना फोन देण्यापूर्वी एअरप्लेन मोड चालू करू शकता. असेही आढळून आले आहे की काही गेम खेळताना इंटरनेट बंद असल्यास त्यांच्यामध्ये जाहिराती देखील कमी दिसतात.

फोनला जास्त गरम होण्यापासून वाचवा

कधीकधी खराब सिग्नल किंवा जड कामांमुळे फोन गरम होतो. अशा वेळेस एअरप्लेन मोड चालू करून तुम्ही प्रोसेसरवरील भार कमी करू शकता आणि तुमचे डिव्हाइस थंड राहील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.