AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुटबॉल चाहत्यांसाठी एअरटेलने सादर केला 40 दिवसांची वैधता, ZEE5 आणि डेली डेटासह नवीन रिचार्ज प्लॅन

तुम्हालाही फिफा विश्वचषक 2026 पाहायचा असेल, तर एअरटेल कंपनीने तुमच्यासाठी 798 रुपयांचा एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनसोबत तुम्हाला ओटीटी लाभांसह दररोज हाय-स्पीड डेटा मिळेल. चला या प्लॅनची संपुर्ण माहिती जाणून घेऊयात.

फुटबॉल चाहत्यांसाठी एअरटेलने सादर केला 40 दिवसांची वैधता, ZEE5 आणि डेली डेटासह नवीन रिचार्ज प्लॅन
| Edited By: | Updated on: Jun 23, 2026 | 11:38 AM
Share

तुम्हाला घरबसल्या फिफा विश्वचषक 2026 चे लाईव्ह सामने पाहायचा आहे, पण तुमच्याकडे ZEE5 चे सबस्क्रिप्शन नाही? ही समस्या सोडवण्यासाठी एअरटेलने 798 रूपये किमतीचा एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. भारतात फुटबॉलप्रेमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष फुटबॉल प्लॅन्स घेऊन आले आहेत. या नवीन प्लॅनद्वारे कंपनी अशा लोकांवर लक्ष केंद्रित करत आहे ज्यांना फिफा विश्वचषक 2026 पाहायचा आहे. पण त्यांच्याकडे ZEE5 प्रवेश उपलब्ध नाही. हा एक डेटा पॅक आहे जो डेटा आणि ओटीटी दोन्ही फायदे देईल. या प्लॅनसाठी आपल्या नंबरवर एक सक्रिय प्लॅन असणे आवश्यक आहे. चला तर मग या प्लॅनचे फायदे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

एअरटेल 798 रूपयांच्या प्लॅन माहिती

जर तुमच्याकडे एअरटेल प्रीपेड सिम असेल तर या प्लॅनची ​​वैधता 40 दिवसांची आहे. किंमत पाहता तुम्हाला वैधता कमी वाटत असली तरी या प्लॅनमध्ये तुम्हाला उत्तम फायदे मिळतील. जसे की यात दररोज 1 जीबी हाय-स्पीड डेटासह महत्त्वपूर्ण फायदे मिळतात. 40 दिवसांची वैधता आणि दररोज 1 जीबी डेटासह या प्लॅनमध्ये एकूण 40 जीबी डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनमध्ये ZEE5 चा ॲक्सेस देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही फिफा विश्वचषक 2026 कोणत्याही परिस्थितीत पाहू शकाल.

जिओचा 798 रूपयांच्या प्लॅनचा माहिती

फुटबॉलप्रेमींना लक्ष केंद्रित करून रिलायन्स जिओचा 798 रुपयांचा प्लॅनही बाजारात नुकताच सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता 40 दिवसांची आहे.

तुम्हाला किती दिवसांसाठी ZEE5 सबस्क्रिप्शन मिळेल?

जरी या प्लॅनमध्ये 40 दिवसांची वैधता असली तरी तुम्हाला 90 दिवसांसाठी ZEE5 चा ॲक्सेस मिळणार आहे. एअरटेलप्रमाणेच हा जिओ प्लॅनदेखील प्रीपेड वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी ZEE5 चा मोफत प्रवेश दिला जाईल.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला