Airtel च्या ‘या’ किफायतशीर प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार

अक्षय चोरगे

|

Updated on: Jan 13, 2021 | 6:47 AM

एयरटेल (Airtel) कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. ज्यामध्ये कॉलिंग, एसएमसएमस आणि स्ट्रिमिंमगचा समावेश केलेला असतो.

Airtel च्या 'या' किफायतशीर प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार

मुंबई : एयरटेल (Airtel) कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. ज्यामध्ये कॉलिंग, एसएमसएमस आणि स्ट्रिमिंमगचा समावेश केलेला असतो. त्यासोबतच अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोफ्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सब्सक्रिप्शन देत आहेत. अशातच एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये सर्व ग्राहकांना मोफत Amazon प्राईमचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. (Airtel Rs 349 prepaid plan gives 2GB daily data with Amazon Prime subscription)

या प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा दिला जातोय. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 56 जीबी डेटा दिला जात आहे. जर तुमचा 2 जीबी दैनिक डेटा संपला तर तुम्हाला 64 केबीपीएस स्पीडवर इंटरनेट वापरता येईल. सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमसएस मोफत दिले जात आहेत.

Amazon प्राईमच्या मोफत सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे झाल्यास हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात आला आहे. या 28 दिवसांमध्ये तुम्ही प्राईमवरील सर्व प्रकारचा कॉन्टेंट पाहू शकता. तसेच एअरटेलने XStream, मोफत हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, मोफत ऑनलाईन कोर्स आणि 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक दिला जात आहे. (Airtel Rs 289 prepaid plan gives 2GB daily data with Zee5 subscription)

289 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही उपलब्ध

युजर्सना जर हा प्लॅन नको असेल किंवा महागडा वाटत असेल तर त्यांच्यासाठी कंपनीने 289 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. तर या प्लॅनसोबत तुम्हाला Zee5 प्रीमियमचं मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. तसेच युजर्सना इतरही अनेक फायदे मिळू शकतील. जसे की, एयरटेल XStream प्रीमियम, मोफत हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, मोफत ऑनलाईन कोर्स आणि फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

Airtel च्या अजून दोन धडाकेबाज ऑफर

एअरटेलने 2 स्पेशल प्लॅन आणले आहेत. यातील एका प्रीपेड प्लॅनची किंमत 249 रुपये आणि दुसऱ्याची 298 रुपये अशी आहे. पहिल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि दुसऱ्यात दररोज 2 जीबी डेटा 28 दिवसांसाठी मिळेल. यापेक्षा अधिक किमतीच्या प्लॅन्समध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात आलं आहे. जर एअरटेल ग्राहकांनी 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स अ‍ॅपवरुन रिचार्ज केला तर 50 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. सध्या तरी एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये तुम्हाला केवळ 298 रुपये आणि 398 रुपयांचा अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन मिळणार आहे. यावर काही कूपन्स देखील मिळू शकतात.

एअरटेलच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच 28 दिवस अनलिमिटेड कॉलचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएसही करता येणार आहेत. 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटाची मर्यादा वाढली आहे. यात दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसचाही फायदा होणार आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीमचं आणि विंक म्यूजिकचं सब्सक्रिप्शन देखील मिळेल. तसेच 150 रुपयांच्या फास्टॅगचा कॅशबॅकही मिळेल.

Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?

खुशखबर ! रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने केली ‘ही’ मोठी घोषणा, ग्राहकांना होणार मोठा फायदा

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

(Airtel Rs 349 prepaid plan gives 2GB daily data with Amazon Prime subscription, check other such plans)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI