मनसेच्या दणक्यानंतर Amazon कडून मराठीत सेवा सुरु, विक्रेत्यांसाठी मराठीचा पर्याय

Amazon ने म्हटलंय की, ते त्यांच्या देशातील रिजनल/लोकल नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मनसेच्या दणक्यानंतर Amazon कडून मराठीत सेवा सुरु, विक्रेत्यांसाठी मराठीचा पर्याय
रोज कमवाल 5000 पेक्षा जास्त पैसे - जर तुम्ही अगदी पद्धतशीर आणि बचतीच्या दृष्टीने व्यवसाय सुरू केला तर या ई-कॉमर्सच्या वेबसाइटवरून तुम्ही रोज 5,000 रुपये आणि दर महिन्याला तब्बल 1,50,000 रुपये कमवू शकता.
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:41 PM

मुंबई : मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर Amazon ने नमतं घेतलं आहे. महिनाभरापूर्वी कंपनीने सांगितले होते की, लवकरच आम्ही आमच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय खुला करु. अद्याप कंपनीने ग्राहकांसाठी मराठी भाषेचा पर्याय दिलेला नसला तरी कंपनीने विक्रेत्यांसाठी मराठीत सेवा सुरु केली आहे. (Amazon added Marathi language in its interface, now shopping in your language)

मनसेने 25 डिसेंबर 2020 रोजी अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर अॅमेझॉनने नमती भूमिका घेत अॅपवर मराठी भाषेचा पर्याय देऊ असं सांगितलं होतं. त्यासंबंधी कंपनीने काम सुरु केलं आहे. अमेझॉन अॅपवर मराठी भाषा लवकरच उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं आहे. तत्पूर्वी कंपनीने विक्रेत्यांसाठी मराठीत सेवा सुरु केली आहे.

भाषेचा अडथळा दूर

कंपनीने म्हटलंय की, ते त्यांच्या देशातील रिजनल/लोकल नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आता मराठी भाषेत त्यांच्या सेवा सुरु केल्या आहेत. कंपनीने रविवारी घोषणा केली आहे की, विक्रेते (सेलर्स) आता मराठी भाषेचा वापर करत त्यांचा व्यवसाय पुढे नेऊ शकतात. कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, “मराठीत सेवा सुरू केल्याने आमच्या ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे लाभ घेऊ इच्छित असलेल्या किंवा आमच्यासोबत एकत्र येत व्यवसाय करु इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो भारतीय उद्योजक, एमएसएमई, स्थानिक दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांसमोरील भाषेचा अडथळा दूर होणार आहे,”

महाष्ट्रातील 85 हजाराहून अधिक विक्रेत्यांना लाभ

अमेझॉनवर महाराष्ट्रातील 85 हजाराहून अधिक विक्रेते नोंदणीकृत आहेत. अशा परिस्थितीत कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव यांसह महाराष्ट्रातील अनेक शहरांतील हजारो, लाखो विक्रेत्यांना मराठीत नोंदणी करून त्यांची खाती (अकाऊंट्स) रजिस्टर करता येतील. यापूर्वी Amazon हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अमेझॉन इंडियाच्या एमएसएमई अँड सेलिंग पार्टनर एक्सपिरियन्सचे संचालक प्रणव भसीन म्हणाले की, विक्रेत्यांना त्यांचे अकाऊंट्स आता मराठी रजिस्टर करता येतील, तसेच मराठीतच ते मॅनेज करता येतील

अमेझॉन-मनसे वाद

अमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा असावी अशी मागणी मनसेने केली होती. परंतु मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे मनसेने अमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले होते. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अॅमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं होतं. परंतु या तक्रारीनंतरच अमेझॉनने नरमाईची भूमिका घेत अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन दिलं होतं. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्यविरुद्धची तक्रारही मागे घेतली होती.

हेही वाचा

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

बॅन केलेलं TikTok पुन्हा येणार; ‘ही’ भारतीय कंपनी अ‍ॅप खरेदीसाठी इच्छूक

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(Amazon added Marathi language in its interface, now shopping in your language)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.