AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 4 तासांत डिलिव्हरी आणि बंपर डिस्काउंट; ॲमेझॉनच्या सेलची तारीख ठरली

ॲमेझॉन प्राइम डे 2026 ची तारीख निश्चित झाली आहे. जुलैमध्ये होणाऱ्या या मेगा सेलमध्ये प्राइम सदस्यांना भरघोस सवलती, बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि जलद डिलिव्हरी दिली जाईल. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

फक्त 4 तासांत डिलिव्हरी आणि बंपर डिस्काउंट; ॲमेझॉनच्या सेलची तारीख ठरली
amazon
| Edited By: | Updated on: May 02, 2026 | 2:50 PM
Share

ऑनलाईन खरेदी करण्याला आजकाल खूप प्राधान्य दिले जात आहे. कारण घर बसल्या आपल्याला हवे ते खरेदी करता येते. अशातच आता ऑनलाइन खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनने भारतात त्यांच्या प्राइम डे 2026 सेलची अधिकृत घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे, प्राइम सदस्यांना विशेष डील्स, भरीव सवलती आणि अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता यावा यासाठी सेलचे आयोजन केले जाते. जुलै 2026 मध्ये होणाऱ्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्युटी, घरगुती सामान यांसारख्या विविध कॅटेगिरीमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि जलद डिलिव्हरी यांसारखे फायदे देखील उपलब्ध असतील. चला तर मग या सेलबद्दल जाणून घेऊयात.

जुलैमध्ये मेगा सेल, फक्त प्राईम सदस्यांसाठी

ॲमेझॉनने पुष्टी केली आहे की त्यांची ‘प्राइम डे 2026’ सेल भारतात जुलै महिन्यात आयोजित केली जाईल. ही भारतातील ‘प्राइम डे’ची दहावे ॲडिशन असेल, ज्यामुळे हे सेल आणखी खास ठरेल. केवळ ॲमेझॉन प्राइम सदस्यच या सेलचा लाभ घेऊ शकतील. दरवर्षीप्रमाणे कंपनी अनेक नवीन उत्पादने सादर करते ज्यात हजारो वस्तूंवर मोठी सूट दिली जाते. मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर उत्तम ऑफर्स ‍असतात ज्यांचा प्राइम सदस्यांना खूप फायदा होतो. जर तुम्ही एखादे प्रोडक्ट कमी किमतीत खरेदी करायचे असेल तर जुलै महिना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनपर्यंत प्रत्येकांमध्ये मोठं डिस्काउंट

ॲमेझॉन प्राइम डे 2026 दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स, किचन, ब्युटी, फॅशन आणि घरगूती किराणा माल यांसारख्या अनेक कॅटेगिरीमध्ये उत्तम डील्स उपलब्ध असतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, नवीन लाँच झालेली प्रोडक्ट देखील या सेलचा भाग असतील. याचा अर्थ ग्राहकांना नवीनतम गॅझेट्स आणि नवीन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स मिळू शकतील. याव्यतिरिक्त, निवडक बँकांच्या कार्डने पेमेंट केल्यास अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध होतील. ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना प्रत्येक खरेदीवर 5% पर्यंत कॅशबॅक मिळेल. यामुळेच हा सेल दरवर्षी लाखो ग्राहकांची प्रतीक्षा संपवतो.

जलद डिलिव्हरी, कॅशबॅक आणि मेंबरशीपचे फायदे

तर ॲमेझॉनच्या या खास सेलमध्ये डिलिव्हरी आणखी जलद केल्याचा दावा आहे. निवडक शहरांमध्ये, ॲमेझॉन नाऊद्वारे ऑर्डर्स अधिक वेगाने पोहोचवल्या जातील. प्राईम सदस्यांना 10 लाखांहून अधिक उत्पादनांवर त्याच दिवशी डिलिव्हरी, 40 लाखांहून अधिक वस्तूंवर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी आणि 40 हजाराहून अधिक उत्पादनांवर चार तासांत डिलिव्हरी मिळेल. 99 रुपयांच्या खरेदीवर मोफत डिलिव्हरीचा लाभही मिळेल. 1,399 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. जर तुमच्याकडे आधीपासून प्राईम सदस्यत्व नसेल, तर मासिक प्लॅन्स 299 रुपयांना, त्रैमासिक प्लॅन्स 599 रुपयांना आणि वार्षिक प्लॅन्स 1,499 रुपयांना उपलब्ध आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल