AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरातील 1 अब्जाहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन्सला हॅकिंगचा धोका, तुमचा फोन सुरक्षित आहे का?

जगभरातील 1 अब्जहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये त्रुटी असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी फर्म विचने (Which?) केला आहे.

जगभरातील 1 अब्जाहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन्सला हॅकिंगचा धोका, तुमचा फोन सुरक्षित आहे का?
| Updated on: Mar 06, 2020 | 11:15 PM
Share

नवी दिल्ली : जगभरातील 1 अब्जहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये त्रुटी असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी फर्म विचने (Which?) केला आहे (Android Smartphone Hacking risk). तसेच या सर्व स्मार्टफोन्सला सर्वाधिक हॅकिंगचा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यामागे सुरक्षेसंबंधित सॉफ्टवेअरमध्ये अपडेट्स न मिळणे हे मोठं कारण असल्याचं विचने नमूद केलं आहे.

सायबर सिक्युरिटी वॉच डॉग विचने म्हटलं आहे, की 2012 किंवा त्याआधी लॉन्च झालेल्या अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्ससाठी हॅकिंग हा मोठा धोका असेल. आतापर्यंत गूगलने या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सुरक्षा संस्थेने गूगलसह अँड्रॉईड स्मार्टफोन कंपन्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोबाईल कंपन्यांनी सॉफ्टवेअर अपडेटबाबत आपल्या यूजर्ससोबत पारदर्शकता ठेवायला हवी, असं मत या सुरक्षा संस्थेनं नोंदवलं आहे.

सामान्यपणे स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोन कितीही महागाचा असला तरी त्या मोबाईलला किती वर्ष सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील हे स्पष्ट करत नाहीत. बहुसंख्य मोबाईलमध्ये 2 ते 3 वर्षांनंतर सॉफ्टवेअर अपडेट मिळणे बंद होते. बीबीसीच्या एका अहवालानुसार गूगलच्या आकडेवारीनुसार जगभरातील 42.1% अँड्रॉईड यूजर्सजवळ Android 6.0 किंवा त्याखालील व्हर्जनचे सॉफ्टवेअर असलेले स्मार्टफोन आहेत.

जगात 5 पैकी 2 स्मार्टफोनला सध्या सुरक्षेसंबंधित अपडेट्स दिले जात नाहीत, असं सुरक्षा संस्था Which? च्या अभ्यासात समोर आलं आहे. या संस्थेने 5 स्मार्टफोन्सची चाचणी केली. यात Moto X, Samsung Galaxy A5, Sony Xperia Z2, Nexus 5 आणि Samsung Galaxy S6 यांचा समावेश आहे.

विचने म्हटलं आहे की, स्मार्टफोनच्या सुरक्षेची तपासणी करण्यासाठी अँटी व्हायरस लॅब AV Comparives ची मदत घेण्यात आली आहे. या कंपनीने वरील पाचही स्मार्टफोन्सला मालवेअरच्या मदतीने प्रभावित केलं. या सर्व फोनमध्ये सहपणे मालवेअर टाकता आला. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी आपल्या युजर्सच्या सुरक्षेत कोणतीही हयगय करायला नको, असं मत विचने नोंदवलं आहे.

हॅकिंगपासून कसं वाचणार?

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Android 6 किंवा त्याआधीचे सॉफ्टवेअर आहेत आणि त्यावर अपडेट मिळत नसतील, तर तात्काळ नवा स्मार्टफोन घेणं योग्य होईल. जर नवा फोन घ्यायचा नसेल, तर आपला आहे तो फोन वापरताना सावध राहा. कोणतंही नवं अॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे टाळा. संशयास्पद वेबसाईट वापरणे टाळा.

Android Smartphone Hacking risk

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.