नवा Iphone खरेदी करणाऱ्यांसाठी डबल गुडन्यूज, कंपनीने घेतला मोठा निर्णय
ॲपल २०२६ पासून आयफोन लाँच करण्याची पद्धत बदलणार आहे. आता दरवर्षी चार फोन एकाच वेळी लाँच करण्याऐवजी दोन टप्प्यांमध्ये (सप्टेंबर-नोव्हेंबर २०२६ आणि मार्च-मे २०२७) आयफोन १८ मालिका सादर केली जाईल.

आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ॲपल (Apple) ही कंपनी आता दरवर्षी सप्टेंबरमध्ये एकाच वेळी चार आयफोन लाँच करण्याची आपली जुनी पद्धत कायमची बदलणार आहे. प्रसिद्ध टेक पत्रकार मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, ॲपल २०२६ पासून आयफोन १८ मालिकेपासून एक नवीन स्ट्रॅटेजी लागू करणार आहे. येत्या २०२६ पासून या नवीन धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आजवर ॲपल कंपनी दर सप्टेंबरमध्ये दोन प्रो (Pro) आणि दोन स्टँडर्ड (Standard) असे चार फोन एकाच वेळी बाजारात लाँच करायची. एकाच वेळी इतके फोन बनवताना आणि डिझाइन करताना कंपनीच्या टीमवर प्रचंड दबाव येत होता. यामुळे काम खूप वाढत असल्याने अनेक गोष्टी वेळेवर पूर्ण होत नव्हत्या. हा ताण कमी करण्यासाठी ॲपलने लाँचिंग दोन भागांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन लवकरच
आयफोन १८ मालिकेसाठी ॲपल खालीलप्रमाणे दोन स्वतंत्र लाँच इव्हेंट आयोजित करण्याची शक्यता आहे. ॲपलच्या या नवीन लाँच धोरणांतर्गत आयफोन १८ सीरिजमधील पहिला फोन सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लाँच होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यात कंपनी आपले सर्वाधिक प्रीमियम मॉडेल, आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स बाजारात आणेल. याव्यतिरिक्त, या लाँचचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन याच काळात सादर केला जाईल.
नवीन लाँच स्ट्रॅटेजी कशी असेल?
ॲपलसाठी हा एक मोठा हार्डवेअर बदल असून कंपनी प्रथमच फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. त्यामुळे या लाँचला विशेष महत्त्व असेल. यानंतर, आयफोन १८ सीरिजचा दुसरा टप्पा मार्च ते मे २०२७ दरम्यान पूर्ण केला जाईल. या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मॉडेल्स लाँच केले जातील. ज्यात आयफोन १८, आयफोन १८ई आणि आयफोन एअरचे अपडेटेड व्हर्जन यांचा समावेश असेल. या पहिल्या टप्प्यातील प्रीमियम मॉडेल्सच्या लाँचिंगनंतर सुमारे सहा महिन्यांनी हे स्टँडर्ड आणि बजेट-फ्रेंडली पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, ज्यामुळे ॲपलला वर्षभर बाजारपेठेत आपले अस्तित्व टिकवून ठेवता येईल.
या नवीन धोरणामुळे ॲपल कंपनीला अनेक फायदे होणार आहेत. प्रत्येक फोनवर अधिक वेळ आणि लक्ष देता येईल. ज्यामुळे उत्पादन अधिक दर्जेदार होईल. तसेच डिझाइन आणि इंजिनीअरिंग टीमवरील कामाचा ताण कमी होईल. यासोबतच वर्षातून दोन वेळा लाँचिंग असल्याने पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांवरचा दबाव कमी होईल आणि उत्पादन वेळेवर पूर्ण होईल. यामुळे आता आयफोन खरेदीसाठी ग्राहकांना एका विशिष्ट वेळेची वाट पाहावी लागणार नाही.
