AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन सेलमध्ये सवलती खऱ्या की खोट्या? ‘या’ 3 टुल्सच्या मदतीने जाणून घ्या

ऑनलाइन विक्रीमध्ये दिसणाऱ्या मोठ्या सवलती नेहमीच खऱ्या नसतात. अनेकदा उत्पादनांच्या किमती सुरुवातीला वाढवून सांगितल्या जातात आणि नंतर मोठ्या सवलती म्हणून कमी दाखवल्या जातात. जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर ही 3 मोफत टुल्सच्या मदतीने तुम्ही उत्पादनाची खरी ‍किंमत तपासू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या खास तीन टुल्सबद्दल...

ऑनलाईन सेलमध्ये सवलती खऱ्या की खोट्या? 'या' 3 टुल्सच्या मदतीने जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 4:29 PM
Share

सणासुद असो किंवा वीकेंड सेल यादरम्यान ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘80% टक्के सूट’ आणि ‘मोठी सवलत’ असे बॅनर सोशल मिडियावर सर्वत्र पाहायला ‍मिळतात. त्यामुळे सवलतीचे हे बॅनर पाहून सामान्य ग्राहक अनेकदा विचार न करता वस्तु कमी किमतीत खरेदी करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सेलमध्ये मोठ्या सवलतीत खरेदी करत असलेल्या वस्तूची खरी किंमत काय होती? अनेकदा कंपन्या सेलच्या काही दिवस आधी उत्पादनाची किंमत वाढवतात आणि मग त्यावर ‘बंपर डिस्काउंट’ असे लेबल लावतात. टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंगच्या भाषेत याला ‘बनावट सवलत’ (फेक डिस्काउंट) म्हणतात. जर तुम्हालाही अशी ऑनलाइन फसवणूक आणि नुकसान टाळायचे असेल तर हे 3 मोफत टुल्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. चला तर मग कोणते आहेत हे मोफत टुल्स याबद्दल जाणून घेऊयात.

1. PriceHistory.app (प्राइस हिस्ट्री ट्रॅकर)

ऑनलाइन वस्तूंची खरी किंमत तपासण्यासाठी हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सोप्या टुल्सपैकी एक आहे. हे Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील उत्पादनांचा संपूर्ण प्राइस हिस्ट्री दाखवते. तुम्हाला फक्त खरेदी करायच्या असलेल्या वस्तूची लिंक कॉपी करून PriceHistory.app मध्ये पेस्ट करायची आहे. हे टुल्स त्या वस्तूच्या मागील महिना, तीन महिने किंवा वर्षातील सर्वात कमी आणि सर्वात जास्त किमतींचा आलेख दाखवते. यामुळे तुम्हाला सेलवरील सूट खरी आहे की खोटी हे पटकन ठरवण्यास मदत होईल.

2. Buyhatke

जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरवर खरेदी करत असाल तर ‘Buyhatke Extension’ तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते. तुम्ही एखाद्या उत्पादनाच्या पेजला भेट देताच, हे एक्सटेंशन स्क्रीनवर एक छोटा आलेख दाखवते, ज्यात त्या वस्तूची अचूक किंमत दर्शवली जाते. इतकेच नाही, तर यात ‘सेट प्राईस ड्रॉप अलर्ट’ हे फीचरसुद्धा आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आवडीची किंमत ठरवू शकता. जसे की जर 20 हजार रुपयांचा फोन 15 हजार रुपयांना उपलब्ध झाला, तर तुम्हाला कळेल. जशी किंमत तुमच्या बजेटमध्ये येईल, तसे ते तुम्हाला त्वरित एक ईमेल किंवा नोटिफिकेशन पाठवेल.

3. Keepa

Keepa हे ॲमेझॉनवर खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात विश्वासार्ह टुल्सपैकी एक मानले जाते. ते ॲप आणि ब्राउझर एक्सटेंशन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. कीपाचे सर्वात मौल्यवान वैशिष्ट्य हे आहे की, ते केवळ सवलतीच दाखवत नाही, तर कोणत्या दिवशी उत्पादन सर्वात स्वस्त होते आणि कोणत्या बँक ऑफर्स किंवा कूपन्स लागू होते याचाही मागोवा ठेवते. जर तुम्ही एखादा महागडा स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा घरगुती उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करण्यापूर्वी कीपावर त्याची योग्य ‍किंमत नक्की तपासा.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...