AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skullcandy चे नवीन हेडफोन्स भारतात लाँच, 60 तासांपर्यंत मिळणार बॅटरी लाईफ जाणून घ्या किंमत

तुम्ही जर प्रीमियम वायरलेस हेडफोन्सच्या शोधात असाल, तर स्कलकँडीचे नवीन हेडफोन्स भारतीय बाजारात लाँच झाले आहे. यामध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि अनेक प्रगत ऑडिओ वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग या हेडफोन्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Skullcandy चे नवीन हेडफोन्स भारतात लाँच, 60 तासांपर्यंत मिळणार बॅटरी लाईफ जाणून घ्या किंमत
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 4:23 PM
Share

स्कलकँडी कंपनीने भारतात त्यांचे नवीन एव्हिएटर 900 ANC ओव्हर-इअर हेडफोन्स लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे हेडफोन्स एकदा चार्ज केल्यावर 60 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. यामध्ये ॲडॅप्टिव्ह ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, THX स्पॅशियल ऑडिओ, हेड ट्रॅकिंग आणि सहा मायक्रोफोन्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सध्या हे हेडफोन्स ग्राहक एका विशेष किमतीत खरेदी करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या हेडफोन्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

स्कलकँडी एव्हिएटर 900 हेडफोन्सची किंमत आणि उपलब्धता

भारतात स्कलकँडी एव्हिएटर 900 ANC ची किंमत 39 हजार 999 आहे, परंतु सध्या ते 24 हजार 999 च्या विशेष प्रास्ताविक किमतीत खरेदी करता येत आहे. कंपनीने या लाँच ऑफरचा कालावधी जाहीर केलेला नाही. ग्राहक हे हेडफोन्स स्कलकँडी इंडिया वेबसाइट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकतात.

स्कलकँडी एव्हिएटर 900 हेडफोन्स: ऑडिओ आणि कनेक्टिव्हिटी फिचर्स

स्कलकँडी एव्हिएटर 900 ANC मध्ये ॲडॅप्टिव्ह ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसाठी सहा अंगभूत मायक्रोफोन आहेत. यात एक ॲडजस्टेबल ‘स्टे अवेअर’ मोड देखील आहे. जो गरजेनुसार सभोवतालचा आवाज ऐकण्यास मदत करतो. हे हेडफोन्स हेड ट्रॅकिंगसह THX स्पॅशियल ऑडिओ आणि मिमीच्या पर्सनल साउंडलाही सपोर्ट करतात. याव्यतिरिक्त यात फाईव्ह-बँड कस्टम EQ, तीन प्रीसेट साउंड प्रोफाइल्स आहे. म्युझिक, पॉडकास्ट आणि बेस बूस्ट, ब्लूटूथ 5.3, मल्टीपॉइंट पेअरिंग, गूगल फास्ट पेअर, गूगल फाइंडर आणि 3.5mm AUX कनेक्टिव्हिटी आहे.

बॅटरी आणि इतर फिचर्स

स्कलकँडी एव्हिएटर 900 ANC मध्ये 40mm ड्रायव्हर्स असून, त्यांची फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स रेंज 20 Hz ते 20 kHz आणि इम्पेडन्स 36 ओहम आहे. यात स्पॉटिफाय टॅप शॉर्टकट्स, मीडिया कंट्रोल्स आणि स्कलकँडी ॲपलाही सपोर्ट आहे. कंपनीच्या मते, ANC बंद असताना हे हेडफोन्स 60 तासांपर्यंत आणि ANC चालू असताना 50 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. यात रॅपिड चार्ज फीचर सुद्धा आहे, ज्यामुळे केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 4 तासांपर्यंत प्लेबॅक मिळतो असा दावा केला जातो.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?