सफारीसह Tata Motors या चार गाड्यांचं उत्पादन थांबणार

टाटा मोटर्स (Tata Motors) चार गाड्यांचं उत्पादन थांबवणार असल्याची शक्यता आहे. कंपनी सर्वात कमी मागणी असणाऱ्या गाड्यांचं उत्पादन थांबवू शकते.

सफारीसह Tata Motors या चार गाड्यांचं उत्पादन थांबणार
टाटा मोटर्सने नोंदवला नवा विक्रम
Nupur Chilkulwar

|

Jul 19, 2019 | 5:06 PM

मुंबई : BS-6 एमिशन नियमांमुळे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या अनेक गाड्यांचं प्रोडक्शन थांबवण्याच्या विचारात आहेत. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून BS-6 एमिशन नियम लागू होणार आहे. सध्याच्या डिझेल इंजिनला BS-6 नियमांनुसार अपग्रेड करण्यात कंपन्यांना खूप खर्च येणार आहे. प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही डिझेल कारचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता टाटा मोटर्स (Tata Motors) चार गाड्यांचं उत्पादन थांबवणार असल्याची शक्यता आहे. कंपनी सर्वात कमी मागणी असणाऱ्या गाड्यांचं उत्पादन थांबवू शकते.

कमी मागणी आणि BS-6 एमिशन नियमांनुसार गाड्यांना अपग्रेड करण्यासाठी येणारा मोठा खर्च हे सर्व पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. काहीच महिन्यांपूर्वी टाटा कंपनीने अनेक गाड्यांमधील विना एअरबॅग असलेल्या व्हेरिअंटचं उत्पादन थांबवलं होतं. त्यानंतर आता टाटा आपल्या काही गाड्यांचंही उत्पादन थांबवणार आहे. BS-6 एमिशन नियम हेच यामागील कारण आहे.

टाटा बोल्ट हॅचबॅक : टाटाच्या बोल्ट हॅचबॅक या गाडीची बाजारात मागणी खूप कमी आहे. त्यामुळे कंपनी या गाडीचं उत्पादन थांबवण्याच्या विचारात आहे.

टाटा झेस्ट कॉम्पॅक्ट सिडॅन : टाटाची झेस्ट कॉम्पॅक्ट सिडॅन ही कंपनीच्या सर्वात जास्त मागणी असलेल्या गाड्यांपैकी एक आहे. तरीही कंपनी या गाडीचं उत्पादन थांबवणार आहे.

सफारी SUV : सफारी SUV टाटाच्या सर्वात प्रसिद्ध गाड्यांपैकी एक आहे. पण एकेकाळी मोठी मागणी असलेल्या या गाडीला सध्या तितकी मागणी नाही. या गाडीच्या जागी कंपनी नव्या BS-6 एमिशन नियमांनुसार असलेल्या बाजारात उतरवू शकते.

हेक्सा कॉसओवर : टाटाची हेक्सा कॉसओवर या गाडीचं उत्पादनही थांबवणार आहे.

संबंधित बातम्या :

म्हातारपणाचा लूक पाहणं महागात पडेल, Face App मधून डेटा चोरीची भीती

एकदा चार्ज करा, 5 दिवस वापरा, शाओमीचा LED लॅम्प लाँच

Old Car : 30 हजारात WagonR, स्वस्तात Swift Dzire !

57 मिनिटात चार्जिंग, 425 किमी चालण्याची क्षमता, Hyundai ची दमदार कार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें