फक्त ‘या’ वेळेला इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाका आणि मिळवा भन्नाट व्ह्यूज!
अनेकदा लोक व्हिडिओ क्वालिटी आणि कॅमेरा अँगल याबद्दल काळजी घेतात, पण इंस्टाग्रामवर यशासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टायमिंग! म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा योग्य वेळेबद्दल सांगणार आहोत की, त्या वेळेत पोस्ट केल्यास तुमचा व्हिडिओ हमखास जबरदस्त व्हायरल होईल!

इंस्टाग्रामवर व्हायरल होणं ही आजच्या तरुण पिढीसाठी आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठी संधी आहे. मात्र फक्त दर्जेदार कंटेंट तयार करून सुद्धा अनेकदा अपेक्षित रीच आणि लाइक्स मिळत नाहीत. यामागचं खरं कारण म्हणजे चुकीच्या वेळी पोस्ट केलेली रील किंवा व्हिडिओ. म्हणूनच, कंटेंटप्रमाणेच व्हिडिओ पोस्ट करण्याचा योग्य वेळ जाणून घेणं तितकंच आवश्यक ठरतं.
बर्याच वेळा असे होते की, अनेकांनी मेहनत घेऊन सुंदर व्हिडिओ तयार केला असतो. पण इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर अगदी काहीच लाइक्स, व्यूज मिळत नाहीत. यामुळे निराशा वाटते. काहींना वाटतं की कदाचित कंटेंटमध्येच काहीतरी कमी आहे. पण खर चूक तर ती पोस्ट चुकीच्या वेळी पोस्ट करणं ही असते.
योग्य वेळ का महत्त्वाचा आहे?
इंस्टाग्रामवर वापरकर्ते काही विशिष्ट वेळांमध्ये जास्त सक्रिय असतात. जर तुमचा व्हिडिओ त्या वेळेत पोस्ट केला गेला, तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. यामुळे जास्त व्यूज, लाइक्स, कमेंट्स व शेअर्स मिळतात आणि त्यामुळेच इंस्टाग्रामचा अल्गोरिदम तुमच्या पोस्टला आणखी लोकांच्या फीडमध्ये दाखवतो. परिणामी, व्हायरल होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.
नेमका कोणता वेळ आहे योग्य?
सोशल मीडिया तज्ज्ञ व युजर बिहेवियर डेटा नुसार खालील वेळा सर्वाधिक फायदेशीर मानले जातात:
• सकाळी 6 ते 9 दरम्यान : दिवसाची सुरुवात करताना लोक फोन तपासतात.
दुपारी 12 वाजता : लंच ब्रेकमध्ये सोशल मिडिया स्क्रोल करणं नेहमीच होतं.
• संध्याकाळी 3 ते 6 : कामातून ब्रेक घेऊन लोक रिलॅक्स होण्यासाठी इंस्टाग्राम उघडतात.
• रात्री 9 ते 12 : हा सर्वाधिक फावल्या वेळेचा काळ असतो, जेव्हा लोक कंटेंट पाहणे पसंत करतात.
प्रत्येक अकाउंटचा वेळ ठरतो वेगळा
तरीही प्रत्येक युजरसाठी हे वेळापत्रक सारखं नसतं. कारण प्रेक्षकांचा प्रकार वेगळा असतो. काही जण विद्यार्थी वर्गाला टार्गेट करतात तर काही प्रोफेशनल वर्गाला. म्हणूनच इंस्टाग्राम प्रोफेशनल डॅशबोर्डमधील “Insights” विभागात जाऊन आपल्या ऑडियन्सच्या अॅक्टिव्हिटीचा अभ्यास करणं सर्वाधिक उपयुक्त ठरतं.
फक्त वेळ पुरेसा नाही तर या इतर गोष्टीही ठेवा लक्षात
1. कॅप्शन मजेशीर आणि थेट असावं.
2. ट्रेंडिंग म्युझिक व टॉपिक्स वापरा.
3. आठवड्यातून 3-4 पोस्ट करण्याचा प्रयत्न करा.
4. योग्य आणि रिलेटेड हॅशटॅग वापरा.
5. प्रेक्षक स्वतःला जोडू शकतील असा कन्टेंट तयार करा.