Apple प्रेमींसाठी मोठी संधी… नवीन आयफोन 14 केवळ 53,900 मध्ये खरेदी करा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 11, 2022 | 8:23 PM

जर तुम्हाला आगामी काळात आयफोनची खरेदी करायची असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. ग्राहक 80 हजारांचा बेस व्हेरिएंट खरेदी करायला अनेकदा डिस्काउंटची वाट बघत असतात. परंतु आता तुमची प्रतिक्षा संपली असून या लेखात सांगण्यात आलेला डिस्काउंट ऑफर्सचा पाहून अनेक ग्राहक आयफोनची खरेदी करणार आहेत.

Apple प्रेमींसाठी मोठी संधी… नवीन आयफोन 14 केवळ 53,900 मध्ये खरेदी करा

ॲप्पल (Apple) आयफोन 14 (Apple iPhone 14) सीरीज नुकतीच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजअंतर्गत लॉन्च झालेल्या आयफोन 14 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. म्हणजेच याचे बेस व्हेरिएंट मॉडेलची किंमत सुमारे 80 हजार आहे. हा स्मार्टफोन आपल्याला सवलतीच्या दरात मिळावा, अशी प्रत्येक ॲप्पलप्रेमीची इच्छा आहे. आता ती प्रत्यक्षात साकार होणार आहे. जर तुम्हालाही नवीन आयफोन 14 (iPhone 14) मॉडेल घ्यायचे असेल, तर आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला हे मॉडेल 53,900 रुपयांमध्ये कसे खरेदी करू शकता, याबद्दल माहिती देणार आहोत.

काय आहे ऑफर्स

इंडिया आईस्टोर वेबसाइटवर आयफोन 14 सह अनेक ऑफर्स लिस्ट करण्यात आल्या आहेत. या मॉडेलसह एचडीएफसी बँक डेबिट-क्रेडिट कार्डवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यासोबतच 3,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील आहे. या दोन्ही फायद्यांचा लाभ मिळाल्यानंतर, 79,900 रुपये किमतीचे हे मॉडेल केवळ 71,900 रुपयांना खरेदी करता येईल.

ज्या ग्राहकांकडे आयफोन 11 असेल आणि ज्यांना आयफोन 14 घेताना आपला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल, तर त्यावर बंपर डिस्काउंट मिळू शकते. एक्सचेंजवर 18000 रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजे पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास, iPhone 14 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 53,900 रुपये होईल.

हे सुद्धा वाचा

5 हजार आणि 3 हजार एक्सचेंज बोनसनंतर, बेस व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपयांऐवजी 71,900 रुपये झाली. 18 हजारांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजेच 18 हजाराचा लाभ मिळाला, तर अशा वेळी ग्राहकांना 71,900 – (मायनस) 18000 (एक्सचेंज) मिळतील. अशा वेळी डिस्काउंटमध्ये हा फोन 53,900 रुपयांमध्ये मिळू शकतो.

मोबाईलच्या स्थितीवर डिस्काउंट अवलंबून

एक्सचेंज व्हॅल्यू ग्राहकांच्या जुन्या आयफोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. ग्राहकांकडे आयफोन 11 व्यतिरिक्त एखादे डिव्हाइस असल्यास, ग्राहक इंडिया आयस्टोर साइटला भेट देऊन एक्सचेंजची किंमत तपासू शकता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI