नवीन मोबाइल खरेदी करायचा विचार करताय ? या ऑफर्स नक्की वाचा
जर तुम्ही नवीन मोबाइल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या या ऑफर्सचा नक्कीच फायदा घेऊ शकता. iPhone 15 सह इतर अनेक लोकप्रिय मोबाइल फोन्सवर आकर्षक डिस्काउंट उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा आवडता मोबाइल कमी किमतीत मिळू शकता.

तुमचा मोबाइल जुना झाला आहे का ? आणि तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सध्या फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्सवर भल्यामोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. iPhone सारख्या प्रीमियम ब्रँडपासून ते Vivo, POCO, Samsung आणि Infinix सारख्या मिड-रेंज व बजेट सेगमेंटच्या स्मार्टफोन्सपर्यंत अनेक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत.
या ऑफर्स अंतर्गत ना केवळ थेट डिस्काउंट मिळत आहे, तर बँक ऑफर्स, EMI पर्याय, आणि एक्सचेंज बोनससारख्या आकर्षक सुविधा देखील दिल्या जात आहेत. यामुळे तुमच्या खिशाला झळ न लागता तुमचा हवेहवा स्मार्टफोन खरेदी करणं अधिक सोपं होणार आहे. चला, तर मग पाहूया कोणत्या मोबाइलवरती किती सवलत दिली जात आहे आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय कोणता ठरू शकतो!
iPhone 15 (256GB):
प्रीमियम सेगमेंटमधील iPhone 15 वर फ्लिपकार्टने आकर्षक डिस्काउंट जाहीर केला आहे. या फोनची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. मात्र, सध्या तो फक्त 74,400 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, थेट 6% सवलत. त्यासोबतच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास आणखी 5% सूट मिळेल. नॉन-EMI पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त बचत होऊ शकते.
Google Pixel 7a:
गुगलचा कॅमेरा-किंग मानला जाणारा Pixel 7a देखील सध्या चांगल्या ऑफरमध्ये उपलब्ध आहे. 43,999 रुपयांची मूळ किंमत असलेला हा फोन, डिस्काउंटनंतर 27,999 रुपयांना विक्रीसाठी आहे. यामुळे 16,000 रुपयांची थेट बचत होणार आहे. EMI पर्यायाने तुम्ही हा फोन 1371 रुपये मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता.
Samsung Galaxy A35 5G:
सॅमसंगचा स्टायलिश 5G फोन A35 देखील फ्लिपकार्टवर 20% डिस्काउंटसह विक्रीसाठी आहे. याची मूळ किंमत 33,999 रुपये असून, सध्या तो 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. इच्छुक ग्राहकांना हा फोन 1322 रुपयांच्या EMI वर सुद्धा मिळू शकतो.
POCO X7 Pro 5G:
POCO चा दमदार परफॉर्मन्स देणारा X7 Pro 5G फोन देखील स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 31,999 रुपयांची मूळ किंमत असलेला हा फोन आता 25,999 रुपयांना मिळतोय. म्हणजेच, 18% चा डिस्काउंट. याशिवाय, हा फोन 2889 रुपये EMI वर घेता येतो.
Vivo T3 5G:
Vivo चा बजेट 5G स्मार्टफोन, T3 देखील भरपूर ऑफरसह उपलब्ध आहे. मूळ किंमत 22,999 रुपये असलेल्या या फोनची विक्री किंमत सध्या 18,499 रुपये आहे. यासोबत, तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास 14,200 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. मासिक हप्ता फक्त 6167 रुपये इतका असेल.
Infinix Note 40 Pro 5G:
Infinix चा हा फोन सर्वात मोठ्या सवलतीसह मिळतोय. 27,999 रुपये किंमतीचा हा फोन आता फक्त 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 32% डिस्काउंट शिवाय, यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देखील मिळते – बजेटमध्ये परफॉर्मन्सचा धमाका!