फालतू मेसेज करणाऱ्यांचे व्हॉटसअप अकाऊंट बंद होणार

जगातील सर्वात मोठी इन्स्टेन्ट मेसेजिंग सर्व्हिस देणारी कंपनी व्हॉटसअॅपने नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे यूजर्सचा बल्क मेसेजपासून सूटका मिळणार आहे.

फालतू मेसेज करणाऱ्यांचे व्हॉटसअप अकाऊंट बंद होणार
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 8:42 PM

मुंबई : जगातील सर्वात मोठी इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारी कंपनी व्हॉटसअपने नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे युजर्सची बल्क मेसेजपासून सुटका होणार आहे. जे तुम्हाला दररोज बल्क मेसेज पाठवतात अशा युजर्सचे अकाऊंट व्हॉटसअप आता बंद करणार आहे. यासोबतच कंपनी अशा लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाईही करु शकते.

व्हॉटसअपने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, आम्ही अशा लोकांचे अकाऊंट बंद करणार जे बल्क मेसेज इतरांना पाठवतात. या फीचरची सुरुवात 7 डिसेंबर 2019 पासून होणार आहे. व्हॉटसअपवर 90 टक्के खासगी मेसेज असतात, पण गेल्या काही दिवसांपासून बल्क मेसेजचा ट्रेंड सुरु झाला आहे.

बल्क मेसेज सर्वाधिक राजकीय पक्ष आणि डिजीटल मार्केटिंग करणाऱ्याकडून पाठवण्यात येत आहेत. तसेच यामाध्यमातून अनेकजण फेक न्यूजही शेअर करतात. यामुळे व्हॉटसअपचे हे पाऊल फेक न्यूज आणि बल्क मेसेजवर आळा आणण्यासाठी मदत करेल.

व्हॉटसअपने म्हटलं की, जर कोणत्या अकाऊंटवरुन 15 सेकंदात 100 मेसेज पाठवले जातात, तर त्या अकाऊंटला बल्क मेसेज म्हणून दोषी ठरवले जाणार आणि त्याचे अकाऊंट बद केले जाईल. तसेच अकाऊंट बनवल्यावर पाच मिनिटानंतर अनेक जणांना मेसेज पाठवल्यास कंपनी त्यांच्या विरोधात कारवाई करणार.

याशिवाय ज्या अकाऊंटवरुन अनेक ग्रुप तयार केले जातात. उदा., जर तुमही कोणतेही व्हॉटसअप अकाऊंट तयार करता आणि तातडीने अनेक ग्रुप तयार करुन अनेक जण जोडले जातात, अशा अकाऊंटना कंपनी बंद करणार आहे.

संबधित बातम्या : 

Archived: स्पायवेअरचा हल्ला, WhatsApp तातडीने अपडेट करा

भारतात Whatsapp बंद होणार ?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.