AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiktok चा मेड इन इंडिया नारा, बाईटडान्स कंपनी भारतीय प्रतिस्पर्ध्यालाच अ‍ॅप विकणार?

टिकटॉकला भारतात तसेच अमेरिकेतही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जो बायडन प्रशासनाने नुकताच टिकटॉकला थोडा दिलासा दिला आहे.

Tiktok चा मेड इन इंडिया नारा, बाईटडान्स कंपनी भारतीय प्रतिस्पर्ध्यालाच अ‍ॅप विकणार?
| Updated on: Feb 15, 2021 | 12:23 PM
Share

नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चार महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने जून 2020 मध्ये टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने बंदी आणलेला पबजी (Pubg) हा मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक (TikTol) हे व्हिडीओबेस अॅपदेखील परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (ByteDance to Sell TikTok India Operations to Rival Glance)

टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स (ByteDance) टिकटॉकची प्रतिसपर्धी भारतीय कंपनी glance ला त्यांचं अॅप विकण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्ग न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. glance आणि ByteDance कंपनीमध्ये सध्या बातचित सुरु आहे. जपानच्या सॉफ्ट बँक ग्रुपने यासंदर्भात पुढाकार घेतला असून त्यांनी चर्चा सुरु केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

आता परवानगी मिळणार?

दरम्यान, असं म्हटलं जातंय की, glance ने टिकटॉक हे अ‍ॅप खरेदी केलं. तर भारत सरकारला या अ‍ॅपला परवानगी द्यावी लागेल. कारण भारतात टिकटॉकसाखे अनेक भारतीय अ‍ॅप्स सुरु आहेत. glance चं व्हिडीओबेस अॅपही भारतात अनेक युजर्स वापरत आहेत. तसेच भारत सरकारचं म्हणणं आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारतीय युजर्सचा डेटा चीनसारख्या देशाच्या हाती जायला नको. भारतीय युजर्सचा डेटा भारतातच राहायला हवा. टिकटॉक अॅप glance ला विकल्यानंतर कोणत्याही अडचणींशिवाय टिकटॉकला भारतात परवानगी मिळेल, असे म्हटले जात आहे. (ByteDance to Sell TikTok India Operations to Rival Glance)

दोन्ही कंपन्यांसाठी (glance आणि ByteDance) सॉफ्ट बँक ग्रुप मोठा गुंतवणूकदार आहे. SoftBank ने ग्लांसची पॅरेंट कंपनी InMobi आणि टिकटॉकची पॅरेंट कंपनी ByteDance दोन्हीमध्ये गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात तिन्ही कंपन्यांमध्ये बातचित सुरु आहे. परंतु ही बातचित अगदीच सुरुवातीच्या टप्प्यांमधील आहे. या चर्चांमध्ये या तीन कंपन्यांसोबत अजून एक पक्षदेखील आहे.

या चर्चांमध्ये एकूण चार प्रमुख पक्ष (पार्टी) आहेत. पहिली पार्टी बाईटडान्स, दुसरी ग्लांस, तिसरी सॉफ्ट बँक आणि चौथी पार्टी इंडियन अथॉरिटीजची आहे. टिकटॉक कंपनी त्यांचं अॅप पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. कंपनी सातत्याने इंडियन अथॉरिटीशी बातचित करत आहे. परंतु अद्याप त्यांच्यात सकारात्मक चर्चा झालेल्या नाहीत.

स्थानिक भागीदार शोधण्याचा प्रयत्न

टिकटॉकला भारतात तसेच अमेरिकेतही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जो बायडन प्रशासनाने त्यांना थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळेच सॉफ्टबँक दोन्ही देशांमध्ये सध्या स्थानिक भागीदार शोधत आहे, जेणेकरून भविष्यात कंपनीला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

संबंधित बातम्या

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

PUBG Mobile India भारतात कधी लाँच होणार?

चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन

भारतातून बाजार उठला तरीही कमाईत अव्वल, PUBG Mobile चा जलवा कायम

(ByteDance to Sell TikTok India Operations to Rival Glance)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.