CES 2021 : Lenovo चा ढासू 11th जनरेशन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या फिचर्स

टेक इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा इव्हेंट Consumer Electronics Show 2021 ची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात Lenovo कंपनीने त्यांचा नवा लॅपटॉप लाँच केला आहे.

CES 2021 : Lenovo चा ढासू 11th जनरेशन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 9:37 AM

मुंबई : टेक इंडस्ट्रीतला सर्वात मोठा इव्हेंट कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोची (Consumer Electronics Show 2021) सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात Lenovo कंपनीने त्यांचा नवा लॅपटॉप लाँच केला आहे. Yoga Slim 7i Pro असं या लॅपटॉपचं नाव आहे. हा एक 11 जनरेशन लॅपटॉप आहे, ज्यामध्ये इंटेल कोर i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या लॅपटॉपची किंमत जाहीर केलेली नाही. लवकरच या लॅपटॉपची किंमत जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. (CES 2021: Lenovo launches Lenovo Yoga Slim 7i Pro with 11th generation intel Icore Processor)

Lenovo Yoga Slim 7i Pro चे स्पेसिफिकेशन्स

या लॅपटॉपमध्ये 14 इंचांचा 2.8K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रेजोल्युशन 2,880×1,800 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90HZ आणि अॅस्पेक्ट रेश्यो 16:10 इतका असून हाय कलर फ्रिक्वेन्सी आणि ब्लॅक सेचुरेशनसह येतो. लेनोव्होच्या या लॅपटॉपचा डिस्प्ले सॅमसंग कंपनीने डिझाईन केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, या लॅपटॉपची स्क्रीन 70 टक्क्यांपर्यंत ब्लू लाईट कमी करते आणि हा लॅपटॉप कडक उन्हातही वापरता येईल.

Lenovo Yoga Slim 7i Pro मधील अन्य फिचर्सबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये 11 जनरेशन इंटेल कोर आय 7 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 16GB रॅम आणि 1TB PCIe SSD स्टोरेजसह येतो. कंपनी हा लॅपटॉप इंटेल Iris Xe ग्राफिक्स किंवा NVIDIA GeForce MX450 पर्यंतच्या डिस्क्रीट ग्राफिक्ससह सादर करु शकते. ऑडियोसाठी या लॅपटॉपमध्ये हार्मन स्पीकर्स आणि डॉल्बी एटमोसने काम केलं आहे. सोबतच या लॅपटॉपमध्ये दोन USB कॉम्बो जॅक देण्यात आले आहेत. लॅपटॉपवर अॅलेक्सा ऑपरेट करण्यासाठी यामध्ये इनबिल्ट माईक देण्यात आला आहे.

30 हजारापेक्षा कमी किंमतीचे भारी लॅपटॉप

HP Notebook 250 G7 Laptop : या लॅपटॉपची स्क्रीन 15.6 इंज इतकी आहे. या लॅपटॉपमध्ये 4 GB RAM आहे. या लॅपटॉपची बॅटरी बॅकअपही चांगली आहे. यामध्ये Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपची किंमत अ‍ॅमेझॉनवर 36 हजार 346 रुपये इतकी आहे. पण Amazon Great Indian Festival Sale 2020 च्या स्कीमनुसार या लॅपटॉपच्या किंमतीवर 19 टक्के डिस्काउंट आहे. त्यामुळे हा लॅपटॉप या स्कीम अंतर्गत फक्त 29 हजार 485 रुपयात मिळेल.

AVITA PURA NS14A6IND541-MEGYB 14-inch Laptop : या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंच आहे. यामध्ये 8 GB RAM आणि Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपची बॅटरी बॅकअप चांगली आहे. त्यामुळे हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर जवळपास 8 तास चालू शकतो. या लॅपटॉपची खरी किंमत 28 हजार 990 आहे. पण दिवाळी ऑफरनिमित्त या लॅपटॉपवर 12 टक्के सूट आहे. त्यामुळे दिवाळीत हा लॅपटॉप फक्त 25 हजार 490 रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

दमदार फिचर्स असलेल्या Xiaomi, Nokia, Infinix च्या ‘या’ स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती

भारतात Samsung Galaxy S21 Series साठी प्री-बुकिंग सुरु, 3,849 रुपयांचं कव्हर मोफत

(CES 2021: Lenovo launches Lenovo Yoga Slim 7i Pro with 11th generation intel Icore Processor)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.