यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

जगभर कोरोना साथीचा रोग पसरत असताना दूरसंचार नेटवर्क आणि तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र ठेवले. लोकांनाही त्याची सवय झाली आहे. त्यामुळे अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञान मिळावं, याबाबतच्या लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 1:33 PM

मुंबई : 2020 हे वर्ष मानवी जीवनातील सर्वात वाईट वर्षांपैकी एक म्हणून लक्षात ठेवलं जाईल. जगभर कोरोना साथीचा रोग पसरत असताना दूरसंचार नेटवर्क आणि तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र ठेवले. लॉकडाऊन असूनही स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि त्यांच्या जोडीला असलेल्या 4 जी नेटवर्कने जागतिक अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. लोक त्यांच्या घरी बसून इंटरनेटद्वारे आरोग्य सेवा, शिक्षण, माहिती आणि करमणुकीचा आनंद घेत आहेत. वेगवान दूरसंचार सेवांसाठी हा महत्त्वपूर्ण काळ आहे. आपण आता तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून होत चाललो आहोत. या तंत्रज्ञानाने आपली मदतच केली आहे. हीच गोष्ट याहीवर्षी होणार आहे. अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञान मिळावं, याबाबतच्या लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे 2021 मध्ये आता अधिक अपग्रेडेड फिचर्ससह स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. जगभरातील सर्वच स्मार्टफोन कंपन्यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. (Best smartphones will be launched earlier this year, many smartphones will releas in flagship segment)

या वर्षाच्या पहिल्या तिमाहित अनेक असे स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत, ज्यांची गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना प्रतीक्षा होती. त्यापैकी काही स्मार्टफोन्सचे फिचर्स लाँचिंगपूर्वीच लीक झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोन्सबाबतची माहिती देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला यावर्षी लाँच होणाऱ्या टॉप फ्लॅगशिप स्मार्टफोन्सबाबतची माहिती देणार आहोत. या लिस्टमधील पहिला फोन हा सॅमसंग गॅलेक्सी S21 हा आहे. या फोनमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच Exynos 2100 चिप मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एस 21 सीरिज (Samsung Galaxy S21 Series)

सॅमसंग गॅलेक्सी S21 सीरिज 14 जानेवरीला भारतात डेब्यू करत आहे. या स्मार्टफोनसाठी भारतात प्री-बुकिंग सुरु झालं आहे. Galaxy S21 सीरिज बिक्सबी व्हॉईससह सादर केला जाण्याची शक्यता आहे. हे एक बायोमेट्रिक व्हॉईस-अनलॉक फिचर आहे. सॅममोबाईलच्या एका रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस 21 सीरिजमध्ये वन यूआयचं रनिंग वर्जन 3.1 लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने काही टिझरही जारी केले आहेत. Galaxy S21 चे काही फोटो आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. यावरून ग्राहकांना या फोनमध्ये काय खास असणार याची कल्पना आली आहे. त्यामुळे या फोनबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

Galaxy S21च्या डिझाईनमध्ये Galaxy S20 च्या तुलनेत बदल पाहायला मिळणार आहे. विषेशत: Galaxy S21 सीरिजचं कॅमेरा मॉड्यूल हे वेगळं असणार आहे. तसेच यावेळी मोबाईलमध्ये काही नवे सेन्सर्सही मिळतील. Galaxy S21 सीरिजमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. परंतु कंपनी भारतातील आपल्या फ्लॅगशिप फोनमध्ये इनहाऊस Exynos प्रोसेसर देते.दरम्यान, असी माहिती मिळाली आहे की, Samsung च्या या सीरिजमध्ये गॅलेक्सी S21, S21 प्लस आणि S21 अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन असतील. या सीरिजमधील S21 अल्ट्रा हा खूप महागडा स्मार्टफोन असणार आहे, कारण हा गोल्ड एडिशन स्मार्टफोन असणार आहे.

रियलमी रेस (realme race)

गेल्या काही वर्षांमध्ये रियलमी ही कंपनी खूप कमी वेळात टॉप स्मार्टफोन्स ब्रँड बनली आहे. ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या शाओमी आणि सॅमसंगला टक्कर देत आहे. 2021 मध्ये ही कंपनी रेस हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर मिळू शकतो. कंपनीने रियलमी X50 या स्मार्टफोनसह फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आता या सेगमेंटमध्ये अजून एक स्मार्टफोन रेसच्या रुपाने लाँच केला जाणार आहे. याद्वारे कंपनी वनप्लस आणि सॅमसंग या कंपन्यांना टक्कर देणार आहे.

रियलमी X7 (Realme X7)

रियलमी कंपनी यावर्षी रियलमी X7 हा स्मार्टफोनदेखील लाँच करणार आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ म्हणाले की, हा रियलमीचा यंदा लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असणार आहे. तसेच हा असा पहिला स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये चिपसेट दिली जाऊ शकते. या फोनमध्ये खूप दमदार फिचर्स असतील, त्यामुळे हा स्मार्टफोन भारतातील अनेक तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मात देईल, असा विश्वासही सेठ यांनी व्यक्त केला आहे.

वनप्लस 9 सिरीज

वनप्लस (OnePlus) ही स्मार्टफोन कंपनी यंदा मार्चमध्ये त्यांची फ्लॅगशिप ‘वनप्लस 9’ सिरीज लाँच करु शकते. या सिरीजमध्ये वनप्लस 9 (Oneplus 9) आणि 9 प्रो (Oneplus 9 Pro) या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असेल. तसेच वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) या स्मार्टफोनचाही समावेश केला जाऊ शकतो. वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) मधील अनेक फिचर्स हे नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 8 T सारखेच असतील. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज किंवा 120 हर्ट्जच्या एमोलेड डिस्प्ले आणि 8 टी प्रमाणे क्वॉड-कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस 9 आणि 9 प्रो क्वॉलकॉमच्या नव्या 5 एनएम चिपसेट आणि स्नॅपड्रॅगन 888 सह लाँच केले जातील. परंतु वनप्लस 9 लाईटमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असेल.

या फोनचा बॅक कव्हर प्लास्टिकचा असेल आणि या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे. असं म्हटलं जातंय की, वनप्लस 9 डिवाइस होप-पंच डिझाईनवाल्या फ्लॅट डिस्प्लेसह लाँच केला जाईल. जिग्मोचायनाच्या रिपोर्टनुसार वनप्लस 9 चं बॅक पॅनल कर्व्ड असेल. तसेच या फोनचा कॅमेरा मॉड्यूल ट्रँगल शेपचा असेल. कॅमऱ्यांमध्ये दोन मोठ्या लेन्स, एक छोट्या आकाराचा कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश असेल. हा फोन एमोलेड डिस्प्ले (सेंटर्ड पंच होलसह), 144 एचझेड रिफ्रेश रेट स्क्रिन, आयपी 68 रेटिंग, एनएफसी, डुअल स्टिरीयो स्पीकर्स आणि अन्य फिचर्ससह लाँच केला जाणार आहे.

Xiaomi Mi 11 ची प्रतीक्षा

चीनमधील मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर Xiaomi Mi 11 हा स्मार्टफोन आता भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर झाली नसली तरी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. चीनमध्ये शुक्रवारी हा फोन विक्रीस उपलब्ध करण्यात आला होता. यावेळी अवघ्या पाच मिनिटात या फोनच्या 3 लाख 50 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi Mi 11 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 3,999 युआन (जवळपास 44,990 रुपये) इतकी आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 4,299 युआन (जवळपास 48,366 रुपये) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंट की किंमत 4,699 युआन (52,866 रुपये) इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचांचा 2K WQHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4600mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा डुअल नॅनो सिम स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा तर 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा

दमदार फिचर्स असलेल्या Xiaomi, Nokia, Infinix च्या ‘या’ स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती

18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

(Best smartphones will be launched earlier this year, many smartphones will releas in flagship segment)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.