डार्क वेब… इंटरनेटच्या जगातील ‘अंडरवर्ल्ड’

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे विद्यार्थी डार्क वेबच्या माध्यमातून इंटरनॅशनल ड्रग्स डीलर्सच्या संपर्कात होते. हे विद्यार्थी डार्क वेबच्या मदतीने इंटरनॅशनल डीलर्सकडून चरस आणि ड्रग्स  मागवून स्थानिक विभागात विकत होते. तुम्ही विचार करत असाल, नेमके हे डार्क वेब आहे तरी काय? आम्ही तुम्हाला आज डार्क वेबबाबत सविस्तर माहिती […]

डार्क वेब... इंटरनेटच्या जगातील 'अंडरवर्ल्ड'
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे विद्यार्थी डार्क वेबच्या माध्यमातून इंटरनॅशनल ड्रग्स डीलर्सच्या संपर्कात होते. हे विद्यार्थी डार्क वेबच्या मदतीने इंटरनॅशनल डीलर्सकडून चरस आणि ड्रग्स  मागवून स्थानिक विभागात विकत होते.

तुम्ही विचार करत असाल, नेमके हे डार्क वेब आहे तरी काय? आम्ही तुम्हाला आज डार्क वेबबाबत सविस्तर माहिती देणार आहोत :

डार्क वेब म्हणजे काय?

डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरील अंडरवर्ल्ड आहे. येथे घातक हत्यार, लोकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स, ई-मेल अॅड्रेस, लोकांचे फोन नंबर, ड्रग्स, नकली करन्सी इतर वस्तू सहज मिळतात. या सर्व गोष्टी येथे खूप कमी दरात मिळतात. आपण ज्या इंटरनेटचा वापर करतो, ते खूप छोटे आहे. इंटरनेटच्या मोठ्या भागापर्यंत लोक पोहचली नाहीत. त्यालाच डार्क वेब म्हणतात, इंटरनेटची ही दुनिया लोकांसाठी अदृश्य आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म ‘Kaspersky Lab’ ने मागेच सांगितलं की, आपली पर्सनल माहिती डार्क वेबमध्ये फक्त तीन हजार पाचशे रुपयांत मिळते. यामध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड, बँक डिटेल्स आणि क्रेडिट कार्ड संबधित माहितींचा समावेश असतो. डार्क वेबमध्ये ड्रग्स आणि इतर घातक वस्तू विकणारे लोक परदेशी असतात. कोरियर किंवा आपल्या एजंट्सच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत आपल्या वस्तू पोहचवतात. डार्क वेबमध्ये मारिजुआना, कोकीन आणि हेरोईनसारखे ड्रग्स सहज मिळतात.

डार्क वेब इंटरनेटच्या अशा विभागात आहे, जिथे युजर्सची ओळख गुप्त राहिली जाते. Tor किंवा Onion सारखे ब्राऊजर्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले जातात.

डार्क वेब खरतर अमेरिकेची देण आहे. अमेरिकन लष्कराने हेरगिरी करण्यासाठी, तसेच सरकारला गुप्त माहिती मिळवून देण्यासाठी याची निर्मीती करण्यात आली होती. हॅकर्ससाठी डार्क वेब हा मोठा अड्डा आहे. मात्र, आता या डार्क वेबचा विळखा तरुणांच्या मानगुटीला बसल्याचे दिसते आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें