AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेम खेळताना मोबाईल स्फोट, तरुणाचा डोळा निकामी

कोल्हापूर : गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (16) असे या जखमी मुलाचे नाव आहे. कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील उंदरवाडी परिसरात अमोल पाटील राहतो. अमोलचे आई-वडिल शेतात गेल्याने तो घरी मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईल गरम होऊन […]

गेम खेळताना मोबाईल स्फोट, तरुणाचा डोळा निकामी
| Updated on: Jun 01, 2019 | 4:22 PM
Share

कोल्हापूर : गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (16) असे या जखमी मुलाचे नाव आहे. कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील उंदरवाडी परिसरात अमोल पाटील राहतो. अमोलचे आई-वडिल शेतात गेल्याने तो घरी मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या हाताला जखम झाली असून, मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला.

या प्रकरणानंतर अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेमुळे परिसरात अनेकांना धक्का बसला.

अनेकदा मोबाईलवर गेम खेळत असताना आपण भान हरपतो. आपल्या हातात किती वेळ मोबाई आहे. तो गरम झाला आहे या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे असे अपघात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात.

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल स्फोट होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मोबाईल चार्जिंगला असताना, चार्जिंग लावून फोनवर बोलत असताना, गेम खेळताना अचानक स्फोट झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. यामुळे लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट

औरंगाबादेत मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट, दोन मुलं जखमी

ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ