Fact Check : व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे कॉल रेकॉर्ड होतात का? व्हायरल होणाऱ्या मॅसेजमागील सत्य काय?

व्हॉट्सअ‍ॅपने तयार केलेल्या या नव्या गोपनीयता धोरणाशी सहमत नसल्याचा दावा अनेक युजर्सने केला आहे. (Fact Check Viral Post On social media)

Fact Check : व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे कॉल रेकॉर्ड होतात का? व्हायरल होणाऱ्या मॅसेजमागील सत्य काय?
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 8:42 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे फार चर्चेत आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने तयार केलेल्या या नव्या गोपनीयता धोरणाशी सहमत नसल्याचा दावा अनेक युजर्सने केला आहे. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या गोपनीयता धोरणाबाबत अनेक मॅसेज व्हायरल होतं आहेत. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे कॉल रेकॉर्ड होऊ शकतात, सरकार तुमच्या चॅटिंगवर नजर ठेवू शकते, सरकारच्या विरोधात मॅसेज केल्यास तुमच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे दावे नव्या प्रायव्हसी पॉलिसीच्या अपडेटनंतर मॅसेजमध्ये केले जात आहे. मात्र या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही, याबाबत नुकतंच एका वृत्तवाहिनीने फॅक्ट चेक केला आहे. (Fact Check Viral Post On social media Whatsapp Privacy Policy)

व्हायरल होणाऱ्या मॅसेजमधील दावा काय?

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या या मॅसेजवर जवळपास 15 खळबळजनक दावे करण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या कथित गाईडलाईन्सची एक यादी व्हायरल होत आहे. यानुसार आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे कॉल रेकॉर्ड करणार आहे. तसेच सरकारकडून व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर लक्ष ठेवले जाणार आहे. जर कोणीही सरकारविरोधी मॅसेज पाठवला तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, यासंह अनेक दावे करण्यात आले आहेत.

हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सला धक्का बसला आहे. लाखो युजर्सने हा मॅसेज शेअरही केला आहे. त्यामुळे या दाव्यांबद्दल शंका कुशंका उपस्थित केली जात आहे.

मात्र नुकतंच एका वृत्तवाहिनीने या व्हायरल पोस्टचा पदार्फाश केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या फॅक्ट चेकनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारी ही यादी पूर्णपण काल्पनिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अशाप्रकारे कोणतीही गाईडलाईन्स जारी केलेली नाही, असे स्पष्टीकरण या दाव्यावर देण्यात आले आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून युजर्सचा डेटा एकत्र करत आहे, हा दावा मात्र खरा ठरला आहे. (Fact Check Viral Post On social media Whatsapp Privacy Policy)

व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा फॅक्ट चेक

पहिला दावा : व्हॉट्सअ‍ॅप आता युजर्सचे कॉल रेकॉर्ड करणार आहे.

फॅक्ट चेक : व्हॉट्सअ‍ॅप कधीही कोणत्याही युजर्सचा मॅसेज बघू शकत नाही. तसेच त्यांचे कॉलही ऐकू शकत नाही, असे व्हॉट्सअ‍ॅपने FAQ सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे कॉल रेकॉर्ड करतं की नाही, याबाबत कोणत्याही बातम्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला ट्रॅक करण्यासाठी आवश्यक असणारा डेटा जमा करत आहे, हे मात्र स्पष्ट झालं आहे.

दुसरा दावा : तुम्ही सरकारविरोधी कोणताही मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करु शकत नाही?

फॅक्ट चेक : याबाबत व्हॉट्सअ‍ॅप किंवा सरकारकडून कोणतीही गाईडलाईन्स देण्यात आलेली नाही.

दरम्यान नुकतीच बिहार सरकारकडून सोशल मीडियाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती. बिहारचे मंत्री, अधिकारी, खासदार आमदार यांच्याविरोधात जर तुम्ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली तर त्यावर कारवाई केली जाईल, असा नियम बिहार सरकारने केला आहे. मात्र इतर राज्यात असा कोणताही नियम करण्यात आलेला नाही.

तिसरा दावा : सरकारकडून व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या मॅसेजवर लक्ष ठेवले जाते.

फॅक्ट चेक : प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने एप्रिल 2020 मध्ये या दाव्याचे खंडन केले होते. सरकारकडून कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या मॅसेजवर लक्ष ठेवले जात नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती

दरम्यान, नुकतंच WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती आणल्या आहेत.त्या अटी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल. (Fact Check Viral Post On social media Whatsapp Privacy Policy)

व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅपने 8 फेब्रुवारीपासून त्यांच्या गोपनीयता धोरणात (Privacy policy) बदल केले आहेत. याबाबत कंपनीने म्हटलं आहे की, “तुम्ही आमच्या अॅपद्वारे तुमच्या मित्रांसह कुटूंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेस (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही”. व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या नवीन निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युजरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.”

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

युजर्सचा डेटा खरंच सुरक्षित आहे का?

युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार असल्याचा दावा WhatsApp ने केला असला तरी दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी म्हणतात की, WhatsApp च्या नव्या गोपनीयता धोरणांमुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार नाही. WhatsApp आता युजर्सची इत्यंभूत माहिती साठवून ठेवणार आहे. प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यावहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). कंपनी आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे. (Fact Check Viral Post On social media Whatsapp Privacy Policy)

संबंधित बातम्या : 

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

WhatsApp | घाबरू नका, तुमचे खाजगी मेसेज सुरक्षित! व्हॉट्सअ‍ॅपचा वापरकर्त्यांना दिलासा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.